Agriculture News in Marathi Cats flood the river, water out of the container | Page 2 ||| Agrowon

मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी (ता. २३) झालेल्या अतिवृष्टीमुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले.

निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी (ता. २३) झालेल्या अतिवृष्टीमुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आल्याने शनिवारी (ता. २५) सकाळी मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. पाण्याच्या अतिप्रवाहामुळे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले आहे. शिवाय जमिनीही खरडून गेल्या. तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मागील काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. शिवाय या पावसामुळे तालुक्यातील लघू व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघण्यात आल्याने मांजरा नदीपात्राच्या बाहेर पाणी पडले. मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीपात्राच्या बाहेर पाणी पडल्याने नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, तूर, ऊस या पिकाचे मोठे नुकसान झाले. पिके पाण्यात वाहून गेली आहेत.

काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी या पाण्यामध्ये वाहून गेल्या असून, या पाण्याचा फटका निलंगा तालुक्यातील शेंद, निटूर, ढोबळेवाडी, बसपूर, शिरोळ-वांजरवाडा, गिरकचाळ, होसूर, नदीवाडी, हंचनाळ आदी गावांना बसला आहे. शिवाय मांजरा नदीला आलेल्या पुराचा फटका निलंगा, शिरूरअनंतपाळ व देवणी या तालुक्यांतील गावाना सर्वांधिक बसला आहे. कांही शेतकऱ्यांचे गोठ्यातील अवजारे वाहून गेली असून, पाण्याच्या अतिप्रवाहामुळे उसामध्ये पाणी जाऊन ऊस आडवा पडला आहे. या पाण्यामुळे गिरकचाळ येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला असून, रस्ता बंद झाला आहे. बसपूर-बाकली येथील पुलावरून पाणी पडल्याने शिरूरअनंतपाळ तालुक्याला जाणारा मार्ग बंद झाला. 

माकणी (ता. लोहारा) येथील धरण भरण्याच्या मार्गावर असून, तेरणा नदीपात्रात कोणत्याही वेळी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय आधिकारी पाटबंधारे उपविभाग क्रमांक तीन लातूर यांनी दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच तालुका प्रशासनाने मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. नदीपात्राच्या पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व गावांना सतर्क राहावे, या बाबत पोलिस पाटील, तलाठी यांना सूचना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली.

तालुक्यातील निलंगा, आंबुलगा, औरादशहाजानी, निटूर, पानचिंचोली, कासारसिरसी या महसूल मंडलात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. असाच उर्वरित पुढील दिवसांत पाऊस पडत राहिल्यास रब्बी हंगामाला हा पाऊस पोषक मानला जात आहे. मात्र सुरुवातीच्या काळात पेरणी झालेल्या खरीप हंगामातील सोयाबीन पीक काही भागांत काढणीला आले असून, याचे नुकसान होणार आहे. 


इतर बातम्या
जालन्यात ३९९५ खातेदारांचे आधार...जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १...
जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतून...जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
कोल्हापूर :महावितरणच्या थकबाकीमुक्तीत ...कोल्हापूर : कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
नाशिक : शेतकरी सोसायटीकडून सभासदांना १५...नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात...
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीत...सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...