agriculture news in marathi, cattle census starts tomorrow in state, pune, maharashtra | Agrowon

राज्यात उद्यापासून टॅबद्वारे पशुगणना
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

पुणे : गेले वर्षभर टॅब खरेदीमध्ये रखडलेल्या २० व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. रविवारी (ता. ३०) परळी येथे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते टॅबद्वारे हाेणाऱ्या पशुगणनेस प्रारंभ हाेणार आहे. ही पशुगणना डिसेंबरअखेरपर्यंत सुरू राहणार असून, विविध १५ पशूंच्या गणनेबराेबर कुक्कुट आणि मस्त्य व्यवसायाची देखील गणना करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

पुणे : गेले वर्षभर टॅब खरेदीमध्ये रखडलेल्या २० व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. रविवारी (ता. ३०) परळी येथे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते टॅबद्वारे हाेणाऱ्या पशुगणनेस प्रारंभ हाेणार आहे. ही पशुगणना डिसेंबरअखेरपर्यंत सुरू राहणार असून, विविध १५ पशूंच्या गणनेबराेबर कुक्कुट आणि मस्त्य व्यवसायाची देखील गणना करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

येथे शुक्रवारी (ता. २८) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. जानकर यांनी ही माहिती दिली. या वेळी पशुंसवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप, अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण उपस्थित हाेते.
पशुगणनेतून विविध पशुधनाची अचूक आकडेवारी उपलब्ध व्हावी यासाठी टॅबद्वारे पशुगणना करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. यासाठीच्या टॅबचा निम्मा खर्च केंद्र शासन करणार आहे. मात्र, टॅब खरेदीसाठी तांत्रिक बाबींमुळे झालेल्या विलंबामुळे २० वी पशुगणना एक वर्ष रखडली हाेती. अखेर या गणनेला मुहूर्त मिळाला आहे.

पशुगणनेसाठी ७१२६ टॅब खरेदी करण्यात आले असून, प्रत्येक गावात, वॉर्डात घराेघरी जाऊन १५ विविध पशूंची गणना करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागात ४५०० कुटुंबांकरिता एक प्रगणक, तर शहरी भागासाठी ६ हजार कुटुंबांसाठी एका प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ४ प्रगणकांमागे एक पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

पशुगणनेमध्ये गाय, बैल (देशी, संकरित), म्हशी, रेडे, याक, मेंढरे (विदेशी, संकरित), शेळ्या, डुकरे, घाेडे, शिंगरे, खेचर, गाढव, उंट, श्वान, हत्ती यांच्यासह कुक्कुट आणि मत्स्य गणना करण्यात येणार आहे. कुक्कुटपालनामध्ये परसातील, पाेल्ट्री फार्ममधील काेंबडी, काेंबडा, बदके, क्वेल, टर्की, इमू आदींची गणना करण्यात येणार आहे.

‘पशुपालकांनी अचूक माहिती द्यावी’
यंदाची पशुगणना अत्याधुनिक पद्धतीने हाेणार असल्याने, यासाठी शेतकरी, पशुपालकांनी अचूक माहिती द्यावी. या आकडेवारीवर नवीन याेजना आखता येणार आहे. हे शेतकरी आणि पशुपालकांच्या हिताचे असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पशुगणनेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
रब्बी हंगामासाठी ‘काटेपूर्णा’चे पाणी...अकोला ः यंदा तुडुंब भरलेल्या काटेपूर्णा...
शेतीमाल वाहतूकदारांची वाहने अडवीत पोलिस...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीमुळे आधीच...
रब्बी हंगामासाठी कुळीथ, हरभरा बियाणे...रत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे...
कर्जमाफीच्या याद्या करण्यासाठी...कोल्हापूर : पूरग्रस्त पंचनाम्यांची माहिती तातडीने...
आपत्तीचा सामना सकारात्मकतेने करा ः...नाशिक : ‘‘मुश्किलो से भाग जाना आसाँ होता है, हर...
पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा...रत्नागिरी ः अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील भात...
सातारा : पावणेदोन लाख शेतकऱ्यांना...सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे...
गडचिरोली : दुर्गंधीमुळे पोल्ट्री बंदचा...गडचिरोली ः मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरणाऱ्या...
लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी...जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या...
खानदेशात कांदा लागवडी वाढण्याचे संकेतजळगाव ः रब्बी हंगामातील कांद्याची खानदेशात यंदा...
पुणे बाजार समितीतील बेकायदा हमाली,...पुणे  ः पुणे बाजार समितीमधील डाळिंब...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून सहा...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात...
तीन जिल्ह्यांत दीड हजार क्विंटल मूग...नांदेड  ः किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
किसान सभेच्या दणक्यानंतर; परळीतील...पुणे ः परळी (जि. बीड) तालुक्यातील खरीप २०१८ मध्ये...
परभणी जिल्ह्यात रब्बीत चार; तर उन्हाळी...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम आणि...
परभणी जिल्ह्यात रब्बीसाठी ४० हजार ९१७...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील...
नगर जिल्ह्यात पावसाने ९४ टक्के कापसाचे...नगर ः आक्टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीची...
कोल्हापुरात ऊस दराबाबतची बैठक फिस्कटलीकोल्हापूर  : यंदाच्या हंगामात कोणत्याही...
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त ...मुंबई  ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...