चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी घटले गोवंश

चांदूर बाजार तालुक्यात गेल्या पाच वर्षांत जनावरांची संख्या ४२ टक्क्यांनी घटल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी घटले गोवंश
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी घटले गोवंश

अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत असल्याने शेतकऱ्यांची गोठेदेखील जनावरांनी भरलेले राहत होते. आता मात्र वाढते यांत्रिकीकरण त्यासोबतच मजुरांची उपलब्धता होत नसल्याने चांदूर बाजार तालुक्यात गेल्या पाच वर्षांत जनावरांची संख्या ४२ टक्क्यांनी घटल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. दर पाच वर्षांनी राज्यात पशूगणना केली जाते. यात गोवंश, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, घोडे, गाढव, वराह यांसह इतर पशूंची गणना होते. सन २०१२-१३ मध्ये चांदूर बाजार तालुक्यात सोळा हजार ६२० नर गोवंशाची संख्या होती. २०१८-१९ च्या पशुगणनेत ती संख्या ९४१० एवढी झाली आहे. त्यावरच गेल्या पाच वर्षांत नर गोवंश अर्थात बैलांची संख्या ७२१० ने (४२ टक्के) घटली आहे.  चांदूर बाजार तालुक्यातील शेती क्षेत्रात दरवर्षी १४४२ इतक्या संख्येने बैलांची घट नोंदविण्यात आली आहे. ही बाब अतिशय चिंतेची मानली जात आहे. गोवंशापासून गोमूत्र तसेच शेणाची उपलब्धता होते. त्याचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढविता येते. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी देखील हे घटक प्रभावी ठरतात. पिकाची उत्पादकता देखील टिकून राहते. त्यामुळे गोवंश शेती करता उपयोगी ठरतो. मात्र, नजीकच्या काळात मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे.त्यामुळे शेती क्षेत्रातून गोवंशाची संख्या कमी होत असल्याचे सांगितले जाते. त्यातच दर्जेदार बैलजोडीची किंमत एक लाखाच्या वर पोहोचली आहे. हे दर सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी इतर म्हणजेच यांत्रिकीकरणाच्या पर्यायावर भर दिला असल्याचे सांगितले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com