agriculture news in marathi Cattle in Chandur Bazar taluka decreased by fourty two percent | Page 3 ||| Agrowon

चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी घटले गोवंश

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

चांदूर बाजार तालुक्यात गेल्या पाच वर्षांत जनावरांची संख्या ४२ टक्क्यांनी घटल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत असल्याने शेतकऱ्यांची गोठेदेखील जनावरांनी भरलेले राहत होते. आता मात्र वाढते यांत्रिकीकरण त्यासोबतच मजुरांची उपलब्धता होत नसल्याने चांदूर बाजार तालुक्यात गेल्या पाच वर्षांत जनावरांची संख्या ४२ टक्क्यांनी घटल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

दर पाच वर्षांनी राज्यात पशूगणना केली जाते. यात गोवंश, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, घोडे, गाढव, वराह यांसह इतर पशूंची गणना होते. सन २०१२-१३ मध्ये चांदूर बाजार तालुक्यात सोळा हजार ६२० नर गोवंशाची संख्या होती. २०१८-१९ च्या पशुगणनेत ती संख्या ९४१० एवढी झाली आहे. त्यावरच गेल्या पाच वर्षांत नर गोवंश अर्थात बैलांची संख्या ७२१० ने (४२ टक्के) घटली आहे. 

चांदूर बाजार तालुक्यातील शेती क्षेत्रात दरवर्षी १४४२ इतक्या संख्येने बैलांची घट नोंदविण्यात आली आहे. ही बाब अतिशय चिंतेची मानली जात आहे. गोवंशापासून गोमूत्र तसेच शेणाची उपलब्धता होते. त्याचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढविता येते. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी देखील हे घटक प्रभावी ठरतात.

पिकाची उत्पादकता देखील टिकून राहते. त्यामुळे गोवंश शेती करता उपयोगी ठरतो. मात्र, नजीकच्या काळात मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे.त्यामुळे शेती क्षेत्रातून गोवंशाची संख्या कमी होत असल्याचे सांगितले जाते. त्यातच दर्जेदार बैलजोडीची किंमत एक लाखाच्या वर पोहोचली आहे. हे दर सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी इतर म्हणजेच यांत्रिकीकरणाच्या पर्यायावर भर दिला असल्याचे सांगितले जाते.


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...