Agriculture news in marathi Cattle health management | Agrowon

जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्ष

डॉ. नरेंद्र करंबेळे, डॉ. भूषण रामटेके, डॉ. गणेश गादेगावकर
मंगळवार, 7 जुलै 2020

पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक असल्याने जनावरे हिरवा चारा जास्त प्रमाणात खातात. परिणामी जनावरांचे शेण पातळ होते, त्यामुळे गोठ्याची स्वच्छता ठेवणे कठीण जाते. हे टाळण्यासाठी कापून आणलेले हिरवे गवत शक्य असल्यास थोडे सुकवून किंवा सुका कडबा, पेंडा यासोबत मिसळून द्यावे.

पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक असल्याने जनावरे हिरवा चारा जास्त प्रमाणात खातात. परिणामी जनावरांचे शेण पातळ होते, त्यामुळे गोठ्याची स्वच्छता ठेवणे कठीण जाते. हे टाळण्यासाठी कापून आणलेले हिरवे गवत शक्य असल्यास थोडे सुकवून किंवा सुका कडबा, पेंडा यासोबत मिसळून द्यावे.

पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते. शेडच्या आतील उष्ण हवा आणि जनावरांचे मलमूत्र यामुळे वातावरण बिघडू शकते. त्यामुळे जनावरांमध्ये तणाव, संसर्गजन्य रोग, परजीवी इत्यादीसारख्या विविध समस्या उद्भवतात. उष्ण व दमट हवामानामुळे साल्मोनेलोसिस, कोलीबॅसिलोसिस, मायकोटॉक्सिकोसिस, घटसर्प, फऱ्या तसेच परजीवी संक्रमणासारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पावसाळ्यात संक्रमित जनावरे माती आणि पाणी दूषित करतात. ज्यामुळे इतर जनावरांमध्ये रोगाचा प्रसार वाढू शकतो.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • गोठ्यामध्ये होणाऱ्या पाणी गळतीचा अप्रत्यक्षपणे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. गोठ्यामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे कॉकसिडीओसीस सारखा आजार होण्याची शक्यता असते.
  • गोठ्याची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्यास तेथे अमोनिया सारख्या वायूचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरांच्या तसेच गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांची जळजळ होऊ शकते.
  • शेडमध्ये पाणी असल्यास बकऱ्यांचे खूर ओले राहून त्यात जखमा होतात. त्यामळे त्यांना पाण्यापासून दूर ठेवण्याची गरज असते.
  • पावसाळ्यात गोठ्यातील जमीन निसरडी होते. त्यामुळे जनावरे घसरून पडण्याची शक्यता असल्यामुळे जमीन कोरडी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वी गोठ्याच्या छप्पराची पाहणी करून आवश्यक ती डागडुजी करावी.

आहार नियोजन 

  • तुटलेल्या किंवा भेगा पडलेल्या छतातून पावसाच्या पाणी गळतीमुळे जनावरांचे खाद्य ओले झाल्यास त्यात बुरशी तयार होते. असे ओले खाद्य जनावरांना दिल्यास त्यांना पचनाचे व श्‍वसनाचे आजार होऊ शकतात. तसेच ओले खाद्य जनावरे खात नाहीत, परिणामी त्यांची उत्पादन क्षमता कमी होते.
  • ओलसर खाद्यात उष्णता वाढून अनेक पोषणमूल्यांचा ऱ्हास होतो. त्यामुळे जनावरांचे खाद्य गोदाम पावसाच्या पाण्यापासून गळती- मुक्त व कोरडे ठेवावे.
  • पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक असल्याने जनावरे हिरवा चारा जास्त प्रमाणात खातात. परिणामी जनावरांचे शेण पातळ होते, त्यामुळे गोठ्याची स्वच्छता ठेवणे कठीण जाते. हे टाळण्यासाठी कापून आणलेले हिरवे गवत शक्य असल्यास थोडे सुकवून किंवा सुका कडबा, पेंडा यासोबत मिसळून द्यावे.

गोचीड समस्या
पावसाळ्यात गोचिडांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. एक गोचीड जवळपास ४ ते ५ मिली रक्त पिते. त्यामुळे जनावरांना अनेमिया होऊ शकतो, अंगाला खाज आल्यामुळे जनावरे अंग भिंतीला घासतात, त्यामुळे जखमाही होऊ शकतात. तसेच बाबेसिया, थॅलेरिया ऍनाप्लास्मोसिस सारखे रोगही जनावरांना होऊ शकतात. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने गोचीड नाशकांची फवारणी करावी.

कासेचा आजार 
पावसाळ्यामध्ये कासेच्या आजारांचे प्रमाण वाढते. गोठ्यातील अस्वच्छतेमुळे दुभत्या जनावरांमध्ये कासेचा दाह म्हणजेच मस्टायटिस होण्याचे प्रमाण वाढते. संसर्गजन्य जीवाणू किंवा इतर सूक्ष्मजीव (बुरशी, किण्व किंवा विषाणु) कासेमध्ये प्रवेश करुन त्यांची संख्या झपाट्याने वाढवतात. त्यामुळे दुधाच्या गाठी तयार होणे, कास कडक होणे, दूध नासणे यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे गोठा स्वच्छ, कोरडा राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जंतांचा प्रादुर्भाव
गोठ्यातील जमिनीवर असलेल्या ओलाव्यामुळे असंख्य जंतुंची वाढ होत असते. ज्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. त्यापैकी सर्वात सामान्य रोग म्हणजे जंतांचा प्रादुर्भाव होय. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वी जनावरांना डॉक्टरांच्या सल्ल्याने जंतनाशक द्यावीत. वेळीच जंतांचा प्रादुर्भाव न रोखल्यास जनावरांच्या एकूण उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.

लसीकरण 

  • जनावरे रोगाला बळी पडू नयेत व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. रोगाची लागण झाल्यावर लसीकरण करणे योग्य ठरत नाही. लसीकरणानंतर जनावरांमध्ये आवश्यक प्रतिबंधक शक्ती तयार होण्यास वेळ लागतो, त्यासाठी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करणे आवश्‍यक आहे.
  • जनावरांच्या गोठ्यात तसेच आजूबाजूला पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते.

संपर्क - डॉ. नरेंद्र करंबेळे, ९८२००३७०१०
(पशुपोषण शास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)\


इतर कृषिपूरक
मधमाशीपालनातून मिळवा प्रोपोलिस, रॉयल...प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत....
मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधीमधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध...
पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापनपावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो....
`मनरेगा‘च्या माध्यमातून पशुसंवर्धन योजनाग्रामीण भागात राहणाऱ्या अकुशल कामगारांना गावातच...
स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजनागोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा....
प्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य...जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे...
स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यादुधाची प्रत ही दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण...
नवजात वासराची घ्यावयाची काळजीआरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले...
गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनकोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२...
जनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचारसर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही....
जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्षपशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची...
शेळ्यांना द्या सकस आहार...शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी...
बायोफ्लाक मत्स्यपालनाचे तंत्रबायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे...
व्यवस्थापन गाई-म्हशींचेसाधारणपणे गाई,म्हशींचा गाभण काळ अनुक्रमे २८० ते...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...