जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
ताज्या घडामोडी
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंद
अकलूज, जि. सोलापूर : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी भरणारा जनावरांचा बाजार बंद केला आहे.
अकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी भरणारा जनावरांचा बाजार बंद केला आहे. फक्त शेळ्या-मेंढ्यांचा बाजार चालू राहणार आहे,’’ अशी माहिती सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जनावरांचा मोठा बाजार भरला जातो. अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यापारी जनावरे खरेदीसाठी येथे येत असतात. दर सोमवारी भरणाऱ्या या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठवडे बाजार व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले होते.
सुमारे ७ महिन्याच्या बंदनंतर जनावरांचा बाजार चालू करण्यात आला. परंतु, जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव होवू लागला. हा रोग संसर्गजन्य असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने बाजार बंद करण्याचे आदेश काढले. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यातच पुन्हा बाजार बंद करण्यात आला आहे.
अकलूज व परिसरात २०० पेक्षा अधिक जनावरांचे व्यापारी आहेत. त्यांना पुन्हा मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने लंपी या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत बाजार बंद राहील, असे सचिव राजेंद्र काकडे म्हणाले.
शेतकऱ्यांची अडचण
अकलूज व परिसरातील ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांकडे गायी, म्हैस याबरोबरच शेळ्या, मेंढ्या, बोकडे, कोंबड्या असतात. अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीने यातील काही जनावरे ही बॅंकेत ठेवलेली मुदत ठेवच असते. जेव्हा पैशाची अत्यंत गरज भासते, तेव्हा बाजारात नेऊन जनावरे विकली जातात. परंतु, बाजार बंद असल्याने जनावरे विकता येणार नाहीत. त्यामुळे खत खरेदीसाठी अथवा उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडणारी व सहज रोख पैशात रूपांतरित होणारी ही ठेव बिनकामाची ठरते. तसेच काही शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी दूध-दूभत्यांसाठी जनावरे खरेदी करावयाची असतात त्यांनाही अडचणी येतात.
- 1 of 1022
- ››