agriculture news in marathi The cattle market at Akluj is closed | Agrowon

अकलूज येथील जनावरांचा बाजार बंद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 2 डिसेंबर 2020

अकलूज, जि. सोलापूर : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी भरणारा जनावरांचा बाजार बंद केला आहे.

अकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी भरणारा जनावरांचा बाजार बंद केला आहे. फक्त शेळ्या-मेंढ्यांचा बाजार चालू राहणार आहे,’’ अशी माहिती सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी दिली. 

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जनावरांचा मोठा बाजार भरला जातो. अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यापारी जनावरे खरेदीसाठी येथे येत असतात. दर सोमवारी भरणाऱ्या या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठवडे बाजार व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले होते.

सुमारे ७ महिन्याच्या बंदनंतर जनावरांचा बाजार चालू करण्यात आला. परंतु, जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव होवू लागला. हा रोग संसर्गजन्य असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने बाजार बंद करण्याचे आदेश काढले. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यातच पुन्हा बाजार बंद करण्यात आला आहे. 

अकलूज व परिसरात २०० पेक्षा अधिक जनावरांचे व्यापारी आहेत. त्यांना पुन्हा मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने लंपी या  संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत बाजार बंद राहील, असे सचिव राजेंद्र काकडे म्हणाले.

  शेतकऱ्यांची अडचण

अकलूज व परिसरातील ग्रामीण भागात अनेक  शेतकऱ्यांकडे गायी, म्हैस याबरोबरच शेळ्या, मेंढ्या, बोकडे, कोंबड्या असतात. अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीने यातील काही जनावरे ही बॅंकेत ठेवलेली मुदत ठेवच असते. जेव्हा पैशाची अत्यंत गरज भासते, तेव्हा बाजारात नेऊन जनावरे विकली जातात. परंतु, बाजार बंद असल्याने जनावरे विकता येणार नाहीत. त्यामुळे खत खरेदीसाठी अथवा उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडणारी व सहज रोख पैशात रूपांतरित होणारी ही ठेव बिनकामाची ठरते. तसेच काही शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी दूध-दूभत्यांसाठी जनावरे खरेदी करावयाची असतात त्यांनाही अडचणी येतात.


इतर बातम्या
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
सिद्धरामेश्‍वर यात्रेत भाकणूक : यंदा...सोलापूर ः ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या...
गहू संशोधनात सर्वांचाच वाटा ः डाॅ. ढवणनाशिक :  येथील गहू संशोधन केंद्रास डॉ....
‘एफपीओं’ना बळकट करण्याची गरज ः चढ्ढा पुणे ः शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत...
कर्मचाऱ्यांनी ‘क्रॉप डॉक्टर’ व्हावे :...पुणे: राज्यातील शेतकरी कष्टपूर्वक शेती करताना...
तुरीला मिळणार दराची ‘फोडणी’ पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात घटीचा अंदाज आहे....
कृषी कायद्यांवर ‘तारीख पे तारीख’ नवी दिल्ली ः शेतकरी नेते कृषी कायदे रद्द...
कोल्हापुरात सकाळपासूनच मतदारांच्या...कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने...
गोंदियात पारा ६.८ अंशांवर पुणे ः विदर्भाच्या अनेक भागांत थंडी चांगलीच वाढली...
पीककर्जापासून वंचित शेतकरी सावकारांच्या...अकोला : वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी...
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले...अकोला : गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये...
सिंधुदुर्गमध्ये चुरशीने मतदान; मतदान...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या...
मराठवाड्यात मतदानासाठी मोठी चुरस औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे...
सोलापुरात ग्रामपंचायतींसाठी चुरशीने...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी...सांगली : जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी...
मराठवाड्यातील रब्बीवर रोगांचे संकट लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
खानदेशात कांदेबाग केळी जोमात जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची लागवड सुमारे एक...
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या...कऱ्हाड, जि. सातारा : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा...