Agriculture news in marathi cattle market in Varkhedi Starting tomorrow | Agrowon

वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून सुरू होणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील पशुधनाचा बाजार उद्यापासून (ता.१३) सुरू होणार आहे. हा बाजार मागील २३ मार्चपासून बंद करण्यात आला होता. यामुळे अनेक शेतकरी, पशुधनाचे व्यापारी यांचे नुकसान झाले आहे. 

पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील पशुधनाचा बाजार उद्यापासून (ता.१३) सुरू होणार आहे. हा बाजार मागील २३ मार्चपासून बंद करण्यात आला होता. यामुळे अनेक शेतकरी, पशुधनाचे व्यापारी यांचे नुकसान झाले आहे. 

वरखेडी पशुधन बाजारात बैल, म्हशी, जातिवंत शेळ्या विक्रीसाठी येतात. दर गुरुवारी हा बाजार असतो. खरीप हंगाम अर्धा संपला तरी हा बाजार बंद असल्याने पशुधनाचे व्यापारी अडचणीत आले. ज्या शेतकऱ्यांना पशुधनाची विक्री करायची होती, त्यांनाही बाजार बंद असल्याने विक्री करता आली नाही. अनेक शेतकऱ्यांना जातिवंत बैल खरेदी करता आले नाहीत. महागडे बैल, म्हशी आणण्याची वेळ अनेकांवर आली. 

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा बाजार सुरू करता येईल, यासाठी सभापती सतीश शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेतली असून, हा बाजार कोरोनासंबंधीची खबरदारी, काळजी घेऊन सुरू करण्यासंबंधी परवानगी मिळाली आहे. तसेच भडगाव येथे शुक्रवारी आणि नगरदेवळा (ता.पाचोरा) येथेही दर सोमवारी पशुधनाचा बाजार सुरू होईल, अशी माहिती बाजार समितीने जाहीर केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...