नाशिक : गोठेधारकांना परवाना नूतनीकरण आवश्यक 

महानगरपालिका क्षेत्रातील गोठे धारकांनी गोठा परवाना नूतनीकरण व नवीन गोठा परवाना ३० एप्रिलपर्यंत करून घेण्याचे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस. के. पाटील यांनी केले आहे.
गोठेधारकांना परवाना नूतनीकरण आवश्यक Cattle owners need license renewal
गोठेधारकांना परवाना नूतनीकरण आवश्यक Cattle owners need license renewal

नाशिक : शासनाने ३१ ऑक्टोबर २००३ च्या अधिसूचनेनुसार महानगरपालिका क्षेत्रासाठी गुरे पाळणे व त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम १९७६ कायदा लागू केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील गोठे धारकांनी गोठा परवाना नूतनीकरण व नवीन गोठा परवाना ३० एप्रिलपर्यंत करून घेण्याचे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस. के. पाटील यांनी केले आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात शहर परिसरासह गंगापूर, आनंदवली, मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, मानूर, वडनेरदुमाला, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पाथर्डी वडाळा शिवार, त्र्यंबक खुर्द, कामटवाडे, चुंचाळे, पिंपळगाव बहुला हे भाग समाविष्ट आहेत. या कायद्यान्वये महानगरपालिका क्षेत्रात विना परवाना गुरे पाळणे, गुरांची ने आण करणे गुन्हा असून, परवाना घेणे व नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. विना परवाना गुरे बाळगणे यासाठी दखल पात्र गुन्हा दाखल करणे व रुपये २ हजारांपर्यंत दंड किंवा ३ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे त्यांनी कळविले आहे.

गोठा परवाना नूतनीकरणासाठी मूळ परवाना व प्रति जनावर रुपये ५० प्रमाणे अनुज्ञप्ती शुल्कसोबत आणणे आवश्यक आहे. ३० एप्रिलनंतर प्रति जनावर प्रतिमहा रुपये ५ प्रमाणे विलंब शुक्ल आकारले जाणार आहे. विना परवाना व परवाना नूतनीकरण न केल्यास गोठेधारकांचे नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तरी गोठे धारकांनी परवाना काढणे व नूतनीकरण करून घेऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष अथवा ०२५३-२९५६२५० यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com