agriculture news in Marathi cattle of rupees 5 crore stolen in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात तीन महिन्यांत ५ कोटींच्या जनावरांची चोरी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाले आहेत. अशातच गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात विदर्भात जवळपास पाच कोटी रुपयांची जनावरे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाले आहेत. अशातच गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात विदर्भात जवळपास पाच कोटी रुपयांची जनावरे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पशुधन विमा योजना बंद असल्याने या शेतकऱ्यांना परतावाही मिळणे शक्य नसल्याने त्यांच्यासमोरील अडचणीत अधिकच भर पडली आहे. 

अमरावती जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांतील पशुधन चोरीच्या घटनांची माहिती पोलिस स्टेशन मधून घेतली. त्यामध्ये गेल्या तीन महिन्यांत पाच कोटी रुपयांच्या जनावरांच्या चोरीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जनावरे चोरीच्या सर्वाधिक घटना अमरावती जिल्ह्यात घडल्या आहेत. एक कोटी १२ लाख रुपयांची जनावरे या जिल्ह्यातून चोरीला गेली आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, बैलजोडी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा केवळ  पोलिस ठाण्यात तक्रारी आकडा आहे.

विदर्भातील विविध जिल्ह्यांत शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची जनावरे चोरीस गेली आहेत. या जनावरांचा पशुधन विमा काढण्यात येत नसल्याने त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही. त्यामुळे पशुधन विमा योजना सुरू करावी, अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली आहे.
- प्रकाश साबळे,  जिल्हा परिषद सदस्य, अमरावती

जिल्हानिहाय्य जनावरे चोरी

अमरावती  १ कोटी १२ लाख
अकोला  ७५ लाख
बुलडाणा  ४० लाख
नागपूर   ५४ लाख
गडचिरोली   ३ लाख
चंद्रपूर  ३ लाख
भंडारा  ५ लाख
वाशीम  ३४ लाख
यवतमाळ ४१ लाख

इतर अॅग्रो विशेष
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...