पशुसंवर्धन बदली प्रकरणात सरकारकडून कॅव्हेट दाखल

पशुसंवर्धन बदली प्रकरणात सरकारकडून कॅव्हेट दाखल
पशुसंवर्धन बदली प्रकरणात सरकारकडून कॅव्हेट दाखल

नागपूर ः पशुसंवर्धन विभागातील बदल्यांचा घोळ संपता संपत नसल्याची स्थिती आहे. सुरवातीला सचिवांनी बदल्या केल्यानंतर त्याला मंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये बदल्या करण्यात आल्या. या प्रकरणात अधिकारी मॅटमध्ये जाण्याची भीती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाकडून मॅटमध्ये कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.  पशुसंवर्धन खात्याचे सचिव अनुपकुमार यांनी केलेल्या या ६६ बदल्यांना दुसऱ्याच दिवशी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी स्थगिती दिली. बदल्यांचे सुधारित आदेश लवकरच काढले जातील, असेही त्यांनी त्या वेळी सांगितले. त्यानुसार १३ जून रोजी नव्याने बदली आदेश काढण्यात आले. पशुसंवर्धन सहसंचालक गट-अ मधील अधिकाऱ्यांच्या बदल्या पहिल्या टप्प्यात करण्यात आल्या. त्यानंतर नागपूर व कोंकण विभागांतील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ४ जुलै रोजी निघाले. पूर्वीच्या बदली आदेशात नमूद असलेल्या ठिकाणाऐवजी नवीन आदेशात दुसऱ्याच ठिकाणी नियुक्‍ती देण्यात आली आहे. नियतकालिक बदल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होतात. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एकंदरीतच सरकारच्या पारदर्शी कारभाराप्रतीदेखील साशंकता व्यक्‍त केल्या जात आहे.  बारामती येथील पशुधन सहसंचालक नारळे यांनी आपल्या बदलीविरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यांना स्थगनादेश मिळाला. त्यानंतर आता नव्याने करण्यात आलेल्या बदल्यांमध्येदेखील अधिकारी मॅट (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण)मध्ये जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरकारकडून खबरदारीच्या उपायांतर्गत न्यायाधीकरणाकडे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. तरीसुद्धा राज्यातील २७ अधिकाऱ्यांनी बदलीविरोधात मॅटकडे धाव घेतल्याची माहिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com