Agriculture news in marathi; CBecause of the technology in the business Increase in income of milk professionals | Agrowon

व्यवसायातील तंत्रज्ञानामुळे दूध व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नागपूर  ः ‘विदर्भ व मराठवाड्यातील दुग्धव्यवसायात क्रांती होऊन दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतीपूरक व्यवसायावर भर देण्यात येत आहे. याच धर्तीवर मुफार्म या संस्थेने दुग्धव्यवसायात येणाऱ्या अडचणी व दूध उत्पादकांचे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी विकसित करण्यात आलेले ॲप ही दुग्धव्यवसायातील नवी क्रांती आहे,’ असे प्रतिपादन रस्ते, परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर  ः ‘विदर्भ व मराठवाड्यातील दुग्धव्यवसायात क्रांती होऊन दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतीपूरक व्यवसायावर भर देण्यात येत आहे. याच धर्तीवर मुफार्म या संस्थेने दुग्धव्यवसायात येणाऱ्या अडचणी व दूध उत्पादकांचे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी विकसित करण्यात आलेले ॲप ही दुग्धव्यवसायातील नवी क्रांती आहे,’ असे प्रतिपादन रस्ते, परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

वनामती येथील वसंतराव नाईक सभागृहात विदर्भ, मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प नागपूर, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आनंद व मुफार्म संस्था यांच्यातील राशन बॅलेंसिंग ॲडव्हायझरी प्रोग्राम व व्हाइट टेक ॲप्लिकेशनबाबत त्रिपक्षीय करारनामा करण्यात आला. त्या वेळी श्री. गडकरी बोलत होते. विदर्भाच्या दुग्धव्यवसायाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक व्यवसाय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धी व उत्पन्नवाढीसाठी शेतीव्यतिरिक्‍त जोडधंद्यामधून शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.’

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री महादेव जानकर म्हणाले, ‘शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.’ या वेळी प्रधान सचिव अनूप कुमार, लक्ष्मीनारायण मिश्रा, मुफार्म संस्थेचे परमसिंग, अरुण रास्ते, मदर डेअरीचे प्रकल्प समन्वयक रवींद्र ठाकरे या वेळी उपस्थित होते. 

इतर बातम्या
मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...