कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
ताज्या घडामोडी
व्यवसायातील तंत्रज्ञानामुळे दूध व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ
नागपूर ः ‘विदर्भ व मराठवाड्यातील दुग्धव्यवसायात क्रांती होऊन दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतीपूरक व्यवसायावर भर देण्यात येत आहे. याच धर्तीवर मुफार्म या संस्थेने दुग्धव्यवसायात येणाऱ्या अडचणी व दूध उत्पादकांचे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी विकसित करण्यात आलेले ॲप ही दुग्धव्यवसायातील नवी क्रांती आहे,’ असे प्रतिपादन रस्ते, परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

वनामती येथील वसंतराव नाईक सभागृहात विदर्भ, मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प नागपूर, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आनंद व मुफार्म संस्था यांच्यातील राशन बॅलेंसिंग ॲडव्हायझरी प्रोग्राम व व्हाइट टेक ॲप्लिकेशनबाबत त्रिपक्षीय करारनामा करण्यात आला. त्या वेळी श्री. गडकरी बोलत होते. विदर्भाच्या दुग्धव्यवसायाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक व्यवसाय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धी व उत्पन्नवाढीसाठी शेतीव्यतिरिक्त जोडधंद्यामधून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.’
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री महादेव जानकर म्हणाले, ‘शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.’ या वेळी प्रधान सचिव अनूप कुमार, लक्ष्मीनारायण मिश्रा, मुफार्म संस्थेचे परमसिंग, अरुण रास्ते, मदर डेअरीचे प्रकल्प समन्वयक रवींद्र ठाकरे या वेळी उपस्थित होते.
- 1 of 581
- ››