Agriculture news in Marathi CCI to buy cotton from open market | Page 4 ||| Agrowon

‘सीसीआय’ करणार खुल्या बाजारातून कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी बाजारात कापसाचे दर वाढल्याने या वर्षी भारतीय कापूस महामंडळाच्या हमीभाव केंद्रावर आवक होण्याची शक्‍यता नाही.

नागपूर ः आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी बाजारात कापसाचे दर वाढल्याने या वर्षी भारतीय कापूस महामंडळाच्या हमीभाव केंद्रावर आवक होण्याची शक्‍यता नाही. परिणामी, भारतीय कापूस महामंडळाने यंदाच्या हंगामात खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा निर्णय घेतला आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या या धोरणामुळे स्पर्धा वाढून आणखी कापसात आणखी तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे. 

नैसर्गिक कारणांमुळे जागतिक स्तरावर कापसाची घटलेली उत्पादकता, परिणामी, रुईच्या दरातील वाढ त्यासोबत डॉलर आणि रुपयाचा विनिमय दर अशा अनेक कारणांमुळे कापसात तेजी अनुभवली जात आहे. जागतिक बाजारात ९० सेंट प्रति पाउंड असा रुईचा दर काही दिवसांपूर्वी होता. त्यात वाढ होऊन हे दर मंगळवारी (ता. १२) १२० सेंट प्रति पाउंडवर पोहोचले आहेत. ४० ते ५० हजार रुपये प्रति खंडीचा (दोन कापूस गाठी) दर असताना तो दर आता ६२ ते ६४ हजार रुपये खंडीवर पोहोचला आहे. एका डॉलरची किंमत ७५ रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी देखील कापसाचे दर वाढविण्यास पोषक ठरली आहे. 

या वर्षी केंद्र सरकारने कापसाला ६०२५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. भारतात देखील आतापासूनच कापसातील तेजीचे संकेत जाणकार देत आहेत. एकूण कापसाचा ठोकताळा विचारात घेता १२५० रुपयांचा प्रक्रिया खर्च व व्यापारी नफा वजा जाता कापसाचे दर ७००० रुपये क्‍विंटल राहण्याची शक्‍यता आहे. बाजारात ६५०० ते ७००० रुपये असा दर राहील, असेही कापूस प्रश्‍नाचे अभ्यासक गोविंद वैराळे सांगतात. या साऱ्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर सीसीआयने यंदा खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा निर्णय घेतला आहे.

जागतिक तेजीच्या परिणामी खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभाव ६०२५ रुपयांपेक्षा अधिक राहणार आहेत. हमीभाव केंद्रावर यामुळे किलोभरही कापसाची आवक होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळेच सीसीआयने यंदाच्या हंगामात खुल्या बाजारातून कापसाच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. परिणामी, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या माध्यमातून हमीभाव केंद्र उघडत खरेदीचा प्रश्‍नच राहणार नाही. पणन महासंघाला हमीभाव केंद्र सुरू करावयाची असल्यास राज्य सरकारच्या निधीतून किंवा स्वनिधीतून ते सुरू करतील. आमची तयारी मात्र यंदा खुल्या बाजारातून कापूस खरेदीची आहे. 
-प्रदीपकुमार अग्रवाल, अध्यक्ष, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) 

पणन महासंघाच्या संचालक मंडळाची शुक्रवारी (ता. २९) बैठक बोलावण्याचे प्रस्तावित आहे. त्या वेळी सीसीआयने घेतलेली खुल्या बाजारातील खरेदीची भूमिका आणि त्याचे परिणाम याविषयी चर्चा होईल. सीसीआय व्यवस्थापनासोबत देखील त्यापूर्वी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानंतरच पणन महासंघ आपली भूमिका ठरविणार आहे. आजवर आम्ही स्वतंत्र खरेदी न करता सीसीआयकरिता एजंट म्हणूनच खरेदी केली आहे.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ 

सीसीआयने खुल्या बाजारातून खरेदीचा घेतलेला निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुखद धक्‍का देणारा आहे. यामुळे निश्‍चितच स्पर्धा वाढून सध्याच्या दरापेक्षा १०० ते २०० रुपयांची तेजी निर्माण होईल. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे. - गोविंद वैराळे, कापूस विषयाचे अभ्यासक

राज्याची कापूस लागवड स्थिती व उत्पादन 
या वर्षी

३९ लाख हेक्‍टर 
७५ लाख गाठी उत्पादन अपेक्षित

गेल्या वर्षी 
४३ लाख हेक्‍टर 
८० लाख गाठी


इतर अॅग्रो विशेष
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून दर्जेदार...जळके (ता.जि. जळगाव) येथील राजेश पाटील यांनी केळी...
आदर्श असावा तर खडतरे कुटुंबासारखामुक्त गोठा पद्धत, नेटके व्यवस्थापन, कुटुंबाची एकी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...