agriculture news in Marathi CCI cotton procurement shut for four days Maharashtra | Agrowon

सीसीआय’ची कापूस खरेदी चार दिवस बंद 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मराठवाडा, खानदेश तसेच नगर जिल्ह्यातील ४८ केंद्रांवरील कापूस खरेदी सोमवार (ता. ११) ते गुरुवार (ता. १४) या कालावधीत बंद राहणार आहे.

परभणी ः महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोशिएशनचा संप तसेच मकर संक्रांतीची सुट्टी असल्यामुळे राज्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मराठवाडा, खानदेश तसेच नगर जिल्ह्यातील ४८ केंद्रांवरील कापूस खरेदी सोमवार (ता. ११) ते गुरुवार (ता. १४) या कालावधीत बंद राहणार आहे. या बाबत केंद्र प्रमुखांनी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सूचना द्याव्यात, असे आदेश ‘सीसीआय’च्या औरंगाबाद येथील उपमहाव्यवस्थाकांनी पत्राद्वारे दिले आहेत. 

‘सीसीआय’ तसेच पणन महासंघाकडून लॉकडाउनच्या काळात खरेदी केलेला कापूस, सरकी, गाठी यांच्या नुकसानीबद्दल भरपाईची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र कॉटन जिनिर्स असोसिएशन तर्फे सोमवार (ता. ११) आणि मंगळवारी (ता. १२) जिनिंग कारखाने बंद ठेवण्यात आहेत. त्याबाबत असोसिएशनने ‘सीसीआय’ला कळविले आहे. बुधवारी (ता. १३) भोगी आणि गुरुवारी (ता. १४) मकर संक्रांत असल्यामुळे कापूस खरेदी बंद राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी या कालावधीत शेतकऱ्यांनी या केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात यावे. 

केंद्र प्रमुखांना आदेश 
या कालावधीत केंद्र प्रमुखांनी परवानगीशिवाय केंद्र कार्यालय सोडू नये, असे आदेश भारतीय कापूस महामंडळाच्या बदनापूर, भोकरदन, बीड, भुसावळ, चाळीसगाव, बोदवड, जामनेर, दोंडाईचा, जिंतूर, जवळा बाजार, जालना, चोपडा, जळगाव, घनसावंगी, गेवराई, गंगापूर, एरंडोल, नंदुरबार, धर्माबाद, कुंटुर, नायगाव, किनवट, वसमतनगर, नांदेड, मानवत, मंठा, लासूर, पाचोड, वैजापूर, शिरपूर, शेवगाव, शहादा, सेलू, ताडकळस, पूर्णा, परतूर, शेंदूर्णी, पहूर, पाचोरा, शहागड, वडवणी, राजूर, शिंदखेडा, नवापूर, यावल, रावेर, बोरी, सोनपेठ येथील केंद्र प्रमुखांना दिले आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...