उताऱ्याच्या अडचणीमुळे सीसीआयची खरेदी रखडत

पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू असून, साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. साठा व इतर बाबी लक्षात घेता पुढील आठवड्यात कापूस खरेदीसंबंधी वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यवाही करू. - आर. जी. हुले, विभागीय व्यवस्थापक, पणन महासंघ, जळगाव विभाग
cotton
cotton

जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व पणन महासंघाची कापूस खरेदी वेगात झाली असून, सुमारे १३ लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. उताऱ्यासह अधिक साठ्याच्या अडचणीमुळे सीसीआयची कापूस खरेदी मागील तीन-चार दिवसांपासून रखडत सुरू आहे.  सीसीआयच्या मापदंडानुसार निर्देशित केंद्रात सध्या एक क्विंटल कापसात साडेचौतीस टक्के रुई अपेक्षित आहे. १०० किलो कापसात ९८ टक्के प्रक्रिया केलेला माल म्हणजेच रुई व सरकी अपेक्षित आहे. परंतु, सध्या कापसामध्ये आर्द्रता कमी असली तरी दर्जा हवा तसा नाही. कवडीयुक्त कापूस अनेक भागांत येत असल्याने हवा तसा उतारा मिळत नाही. चार टक्के घट एक क्विंटल कापूस प्रक्रिया केल्यानंतर येत आहे. अशा स्थितीत खरेदी केलेल्या कापसात नुकसान झाल्यास निर्देशित केंद्रातील संचालक व जिनिंग प्रेसिंग कारखानदार जबाबदार असणार आहेत. यामुळे सीसीआयच्या खानदेशातील केंद्रांमध्ये खरेदी रखडत सुरू आहे.  पणन महासंघाची खरेदी मात्र व्यवस्थित सुरू आहे. महासंघाचे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, अमळनेर, धुळे (दळवेल) येथील केंद्रात खरेदी व्यवस्थितपणे झाली आहे. सीसीआयची खरेदी आठ लाख क्विंटलपेक्षा अधिक झाली आहे. तर पणन महासंघाने भडगाव, पारोळा, अमळनेर, धरणगाव, धुळे, मालेगाव (जि. नाशिक) येथील केंद्रांमध्ये मिळून साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी केली आहे.  सीसीआयचे जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्‍यातील पहूर, शेंदूर्णी, जामनेर, बोदवड, भुसावळ, पाचोरा, एरंडोल, जळगाव, धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार येथे खरेदी केंद्र सुरू होते. यातील एरंडोल व जळगाव आणि शिरपूर, शहादा येथे खरेदी अधिक झाल्याचे सांगण्यात आले.  आव्हाणे केंद्रात तक्रार सीसीआयच्या आव्हाणे (ता. जळगाव) येथील केंद्रात मापदंडानुसार आवक न झालेल्या कापसाची खरेदी नाकारल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी तक्रार केली. खरेदी बंदही पाडली. शेतकऱ्यांची तक्रार व कापसाची कमी दर्जाची आवक लक्षात घेता या केंद्रातील खरेदी केंद्रसंचालक यांनी पुढील आदेश जारी होईल, तोपर्यंत बंद केली आहे. यासंदर्भातील पत्र सीसीआयच्या वरिष्ठ कार्यालयासह बाजार समितीला देण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com