नायगाव येथे ‘सीसीआय’तर्फे कापूस खरेदी सुरु

नांदेड : लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील शिल्लक कापूस खरेदी करण्यासाठी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) तर्फे गुगल लिंकव्दारे नोंदणी सुरु आहे. शुक्रवार (ता.१७) पर्यंत जिल्ह्यातील १० हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
CCI started buying cotton at Naigaon
CCI started buying cotton at Naigaon

नांदेड : लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील शिल्लक कापूस खरेदी करण्यासाठी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) तर्फे गुगल लिंकव्दारे नोंदणी सुरु आहे. शुक्रवार (ता.१७) पर्यंत जिल्ह्यातील १० हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नायगाव येथील भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) च्या केंद्रांवर गुरुवार (ता.१६) पर्यंत ४५ शेतकऱ्यांचा ७९८ क्विंटल कापूस खरेदी झाला. 

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची छाननी करुन संबंधित बाजार समितीकडून कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत आहे. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखत खरेदी केली जाते, असे संबंधित सूत्रांनी सांगितले 

‘लॉकडाऊन’मुळे जिल्ह्यात पणन महासंघ, सीसीआय, खासगी कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘सीसीआय’चे केंद्र प्रमुख, सहकार विभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची ‘व्हिडिओ कॉन्फरंसिंग’व्दारे बैठक घेतली. त्याद्वारे कापूस खरेदी सुरु करण्याचे, गर्दी टाळण्यासाठी गुगुल लिंकव्दारे शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे निर्देश दिले. 

नांदेड (दाभड), किनवट, धर्माबाद, नायगाव, कुंटूर, बिलोली या सहा ठिकाणी सीसीआयचे खरेदी केंद्रे आहेत. गुरुवार (ता.१६) पर्यंत या केंद्रांतर्गंत समाविष्ट तालुक्यातील १० हजार १६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नायगाव केंद्रातंर्गत ३ हजार ४०६ शेतकरी, कंधार तालुक्यातील ३ हजार १७९, लोहा तालुक्यातील २५७६, किनवटमधील १ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. अद्याप अनेक तालुक्यांत नोंदणीची माहिती उपलब्ध नाही. 

पूर्वी कापूस घातलेल्या शेतकऱ्यांची नोंद ‘सीसीआय’कडे आहे. शेतकरी स्वतः गुगल लिंकव्दारे नोंदणी करत आहेत. अनेक शेतकऱ्ंयाकडून क्षेत्रापेक्षा अधिक कापूस उत्पादनाच्या नोंदी करण्यात आल्या. त्यामुळे खरेदीसाठी अडचणी येत आहेत. नोंदणीकृत शेतकऱ्यांची माहिती कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून छाननी होत आहे. त्यानुसार कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची यादी निश्चित केली जात आहे.  दररोज २० शेतकऱ्यांना संपर्क 

खरेदी केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी दररोज यादीतील २० शेतकऱ्यांना संपर्क करुन खरेदी केंद्रांवर कापूस आणण्यास सांगतिले जात आहे. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नायगाव येथील केंद्रांवर सोमवार (ता.१३) पासून कापूस खरेदी सुरु आहे. गुरुवार (ता.१६) पर्यंत ४५ शेतकऱ्यांच्या ७९८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली, असे बाजार समिती, ‘सीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com