agriculture news in marathi, cci will purchase ten lacks cotton bells, jalgaon, maharashtra | Agrowon

सीसीआय १० लाख कापूस गाठींची खरेदी करणार 

चंद्रकांत जाधव
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यंदा शासकीय कापूस खरेदी ऑक्‍टोबरमध्ये सुरू करण्यासंबंधी तयारी करीत आहे. यंदा १० लाख गाठींची खरेदी देशभरात विविध खरेदी केंद्रांच्या माध्यमातून केली जाईल, अशी माहिती सीसीआयच्या अध्यक्षा डॉ. पी. अली राणी यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली. 

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यंदा शासकीय कापूस खरेदी ऑक्‍टोबरमध्ये सुरू करण्यासंबंधी तयारी करीत आहे. यंदा १० लाख गाठींची खरेदी देशभरात विविध खरेदी केंद्रांच्या माध्यमातून केली जाईल, अशी माहिती सीसीआयच्या अध्यक्षा डॉ. पी. अली राणी यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली. 

डॉ. राणी या जैन हिल्स येथे सोमवारी (ता.२३) आयोजित महाकॉट वार्षिक संमेलनात आपली भूमिका मांडण्यासह जिनर्स, व्यापाऱ्यांचे मुद्दे समजून घेण्यासाठी सहभागी झाल्या होत्या. यानिमित्त त्यांच्याशी ‘ॲग्रोवन’ने काही मुद्यांवर चर्चा केली.
 ‘‘सीसीआयची खरेदी सध्या हरियानामध्ये सुरू आहे; परंतु तेथे मागील वित्तीय वर्षात जे दर होते, त्याच दरात म्हणजेच ५४५० रुपयात खरेदी केली जात आहे. महाराष्ट्र व इतर भागात अद्याप कापूस घरात आलेला नाही. ही बाब लक्षात घेता ऑक्‍टोबरमध्ये खरेदी सुरू केली जाईल. शक्‍य झाल्यास ही खरेदी नवीन दरानुसार म्हणजेच ५५५० व ५४५० या दरात ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. तारीख नेमकी सांगता येणार नाही. कारण यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे,’’ असे त्यांनी यासंबंधीच्या प्रश्‍नावर सांगितले.

बोंड अळी व शेतकऱ्यांसंबंधी सीसीआय काय करीत आहे, या मुद्यांवर विचारले असता, ‘‘आपल्याकडे उत्तम दर्जाचा कापूस येतो. आपला कापूस उत्पादनात आघाडीवर आहोत. हे शेतकरी, जिनर्स आदींच्या श्रमामुळे शक्‍य होते. काही प्रश्‍न आहेत; परंतु सीसीआय शेतकऱ्यांचा मजुरी खर्च लक्षात घेऊन त्यांना कापूस वेचणी यंत्र देणार आहे,’’ असा मुद्दा त्यांनी सांगितला. 

नऊ लाख गाठी पडून
सीसीआयने मागील हंगामात ११ लाख गाठींची खरेदी केली. नव्या हंगामातही देशात १० लाख गाठींची खरेदी करू. मागील हंगामातील नऊ लाख गाठी पडून आहेत. यातील दोन लाख गाठींची विक्री ई-लिलाव प्रक्रियेतून केली आहे. पारदर्शकपणे यासंबंधीची कार्यवाही केली आहे. पडून असलेल्या नऊ लाख गाठींसंबंधी नुकसान आलेले नाही. कारण आम्ही नफा लक्षात घेऊनच त्यांची विक्री करू. त्यांचे सुरक्षित किंवा व्यवस्थित साठे आम्ही केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...