Agriculture news in marathi CCI's cotton procurement awaits in Buldana district | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदीची प्रतीक्षा कायम 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

बुलडाणा ः कापूस उत्पादनात सुरुवातीपासून अग्रेसर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी अद्यापही सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. जिल्ह्यात पाच खरेदी केंद्र असताना एकाही ठिकाणी खरेदी होत नाही. तर पणन महासंघाच्या चारपैकी दोन केंद्रांवर खरेदी सुरू असून तेथेही फारसा कापूस घेण्यात आलेला नसल्याची वस्तुस्थिती आहे. 

बुलडाणा ः कापूस उत्पादनात सुरुवातीपासून अग्रेसर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी अद्यापही सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. जिल्ह्यात पाच खरेदी केंद्र असताना एकाही ठिकाणी खरेदी होत नाही. तर पणन महासंघाच्या चारपैकी दोन केंद्रांवर खरेदी सुरू असून तेथेही फारसा कापूस घेण्यात आलेला नसल्याची वस्तुस्थिती आहे. 

शासनाने आदेश देत कापूस खरेदी सुरू करण्याचे सांगितले होते. परंतु कापूस खरेदीचा गुंता सुटलेला नाही. जिल्ह्यात सीसीआयचे पाच खरेदी केंद्र आहेत. नांदुरा, मलकापूर, खामगाव, चिखली व येरळी हे पाच केंद्र आहेत. यापैकी एकाही केंद्रावर खरेदी सुरू झालेली नाही. कापूस उत्पादक पणन महासंघाकडे असलेल्या चार केंद्रांपैकी शेगाव व देऊळगावराजा हे केंद्र सुरू झाले. या दोन्ही केंद्रांवर मिळून ५०० क्विंटल देखील कापसाची खरेदी झालेली नाही. 

कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी मोठी असून कापूस खरेदी तुलनेने अत्यल्प होत आहे. एप्रिल महिना संपला असून आता केवळ एक महिना (मे) कापूस खरेदी होऊ शकेल. जूनमध्ये पाऊस सुरू होताच खरेदी बंद करण्यात येते. सध्या जेथे खरेदी सुरू आहे. त्याठिकाणी कापूस ग्रेडवरून मोठा गोंधळ सुरू आहे. केवळ एफएक्यू दर्जाचाच कापूस शासन खरेदी करीत आहेत. परिणामी आता शिल्लक असलेल्या दिवसांत किती खरेदी होईल हे केंद्र कार्यान्वित होण्यावर अवलंबून आहे. केंद्र खरेदीबाबत अद्याप कोणीही ठाम माहिती द्यायला तयार नाही. 

सीसीआयकडील केंद्र
नांदुरा, मलकापूर, खामगाव, चिखली, येरळी 

पणन महासंघाचे केंद्र
जळगाव जामोद, देऊळगावमही, शेगाव, देऊळगावराजा 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...