Agriculture news in marathi CCI's cotton procurement stalled in Khandesh | Agrowon

खानदेशात सीसीआयची कापूस खरेदी रखडत 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी रखडत सुरू आहे. कमी मजूर, अधिकाऱ्यांची कमतरता आदी कारणांमुळे काही केंद्र सुरू तर काही बंद, अशी स्थितीदेखील आहे. खानदेशात सीसीआयचे जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर तालुक्‍यातील पहूर, शेंदूर्णी, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा येथे खरेदी केंद्र मंजूर आहेत. 

जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी रखडत सुरू आहे. कमी मजूर, अधिकाऱ्यांची कमतरता आदी कारणांमुळे काही केंद्र सुरू तर काही बंद, अशी स्थितीदेखील आहे. खानदेशात सीसीआयचे जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर तालुक्‍यातील पहूर, शेंदूर्णी, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा येथे खरेदी केंद्र मंजूर आहेत. 

यातील जळगाव येथील केंद्र वगळता इतर केंद्र सुरू झाले आहेत. तर इतर केंद्रांमध्ये कमी मजूर व अधिकाऱ्यांची रजा आदी कारणांमुळे खरेदी रखडत सुरू आहे. मागील दोन दिवसांत खरेदी सुरू झाली आहे. २९ फेब्रुवारीनंतर खानदेशातील बहुसंख्य कापूस खरेदी केंद्र बंद झाले होते. कोरोना, घट, उताऱ्याच्या अडचणी यामुळे केंद्रधारक (जॉब वर्कर्स) कारखानदार खरेदी केंद्र सुरू करायला तयार नव्हते. लोकप्रतिनिधी, केंद्रीय मंत्री यांनी या अडचणींबाबत काही मुद्दे मार्गी लावले. यानंतर ही खरेदी सुरू झाली आहे. तीदेखील रखडत सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

जळगाव जिल्ह्यात पणन महासंघाची कापूस खरेदी मागील आठवड्यातच सुरू झाली असून, सुमारे १० हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी महासंघाने केली आहे. जिल्ह्यात कासोदा (ता. एरंडोल), पारोळा, दळवेल (ता. पारोळा), धरणगाव येथे कापूस खरेदी सुरू आहे. 

रोज २० वाहनांमधील कापसाचीच खरेदी 
केंद्रात जेवढी वाहने येतील, त्यातील कापसाची खरेदी करण्याचे शासनाने म्हटले आहे. परंतु जिल्ह्यात सीसीआय व महासंघाच्या केंद्रात रोज फक्त २० वाहनांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. कोरोनामुळे गर्दी वाढू नये, सुरक्षित अंतर राखले जावे, यासाठी कापूस खरेदीबाबत मर्यादा घातल्याचे सूत्रांनी सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...