मनमाड येथे कांदा चोरी रोखण्यासाठी लावले सीसीटीव्ही कॅमेरे

कॅमेरा
कॅमेरा

नाशिक: कांद्याला बाजारात चांगले दर मिळत असल्याने चोरांनी कांद्यावर डल्ला मारणे सुरू केले आहे. मालेगाव तालुक्यातील कौळाने आणि कळवण तालुक्यांत मोकभनगी येथे चोरट्यांनी कांद्यावर डल्ला मारला होता. या घटनेचा मनमाड शहरासह परिसरातील शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे. काही शेतकऱ्यांनी तर कांदा चाळीवर खडा पहारा सुरू केला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी कांद्याच्या खळ्यांवर पगारी राखणदार ठेवण्यात आले आहे. तरी अधिक सुरक्षेच्या अंगाने राखणदार मिळत नसल्याने काही शेतकरी, व्यापाऱ्यांनी कांदा चाळीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.  मनमाड शहरात कांदा व्यापाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यात काही व्यापारी निर्यातदार असून बाजार समितीत शेतकऱ्याकडून कांदा खरेदी केल्यानंतर तो शेडमध्ये नेला जातो. तेथे प्रतवारीनुसार कांदा वेगळा केल्यानंतर गोण्यात भरून तो वेगवेगळ्या राज्यात आणि विदेशात पाठविला जातो. सध्या कांद्याच्या भावात चांगलीच वाढ झाली. अनेक व्यापऱ्यांकडे सध्या चालू तेजीच्या दरात कांदा खरेदी केली आहे. त्यामुळे चोरी झाल्यास मोठे नुकसान होण्याची भीती समोर आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तर तातडीने कांदा शेडमध्ये सीसीटीव्ही बसवून घेतले आहेत. त्यामुळे चोरट्यांना जरब बसणार आहे. आधी कांदा चाळीत-खळ्यात, मळ्यात उघड्यावर ठेवण्यात येत होता. त्यामुळे तो सहज चोरता येतो, ही संधी साधून मालेगाव तालुक्यातील कौळाणे आणि कळवणच्या मोकभगणी येथे चोरट्यांनी चाळीतील साठवून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा कांदा चोरून नेला. दोन वर्षांपूर्वी देखील कांद्याच्या भावात वाढ झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कांदा चोरीच्या घटना घडल्या होत्या. आताही चोरटे कांदा चोरी करू लागल्याचे पाहून मनमाड शहर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यासोबत व्यापाऱ्यामध्ये खळबळ उडून त्यांनी एका प्रकारे कांदा चोरीच्या घटनांचा धसकाच घेतला आहे. काही शेतकरी कांदा चाळीवर खडा पहारा देत आहे. काहींनी राखणदार ठेवले तर काही सीसीटीव्ही लावण्याच्या तयारीत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com