मंगरुळपीरमधील ‘ॲग्रोवन कट्ट्या’चा ११ वा वर्धापन दिन साजरा

मंगरुळपीरमधील ‘ॲग्रोवन कट्ट्या’चा ११ वा वर्धापन दिन साजरा
मंगरुळपीरमधील ‘ॲग्रोवन कट्ट्या’चा ११ वा वर्धापन दिन साजरा

मंगरुळपीर, जि. वाशीम : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या सकाळ माध्यम समूहाच्या ॲग्रोवन या दैनिकाचा मंगरुळपीर येथे गेल्या ११ वर्षांपासून ॲग्रोवन कट्टा सुरू आहे. या कट्ट्याचा शनिवारी (ता. ३) वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ॲग्रोवन कट्ट्याचे संचालक रशीद शादा यांना नागरिकांनी या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या.

यानिमित्त झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी भाऊराव व्यवहारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांची उपस्थिती होती. मंगरुळपीर येथे गेल्या ११ वर्षांपासून एका छोट्याशा सायकल दुकानात रशीद शादा या अल्पभूधारक शेतकऱ्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक वाचनासाठी येथे ॲग्रोवन पेपरची सुरवात केली. 

शेतकरी व शेती या दोन्ही बाबींचा अभ्यास कसा करावा, हे ॲग्रोवन कट्ट्यावर येऊन वाचन केल्यानंतरच लक्षात येते हे त्यांनी शेतकऱ्यांना ११ वर्षांपूर्वी पटवून दिले. आज दरदिवशी अनेक शेतकरी या कट्ट्यावर येऊन ॲग्रोवनचे वाचन करीत असतात. रशीद शादा यांनी शेतकऱ्यांसाठी १० पेपर व बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था केली आहे. याकरिता त्यांना शेतकरी केशवराव भगत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.  

११ व्या वर्धापन दिनास शेतकरी गंगाराम कालापाड, पुंडलीकराव तेलंग, प्रवीण ठाकरे, लक्ष्मणराव शिंदे, भीमराव श्रृंगारे, सुनील मालपाणी, संजय राऊत, वऱ्हाडे गुरुजी, जुम्मा कालिवाले, मोहंमद यासीर, पंजाबराव पाकधने, समर्थ भगत, सुभान नंदावाले, मोहंमद नंदावाले, गंगाराम खंडरे, गजानन पाकधने, डिंगाबर गिरी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचलन केशवराव भगत यांनी केले, तर रशीद शादा यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com