बळीराजा गौरव दिन घराघरांत साजरा करा : महादेव खुडे

कष्टकऱ्यांच्या सन्मानार्थ बळीराजा गौरव दिन घराघरांत साजरा व्हावा. यासाठी शेतकरी, परिवर्तनवादी, संविधान प्रेमी नागरीकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परिवर्तनवादी साहित्यिक महादेव खुडे यांनी केले.
बळीराजा गौरव दिन घराघरांत साजरा करा : महादेव खुडे
बळीराजा गौरव दिन घराघरांत साजरा करा : महादेव खुडे

नाशिक : दर वर्षी नाशिक शहरातील सर्व पुरोगामी पक्ष-संघटना 'बळीराजा गौरव दिन' बलिप्रतिपदेच्या दिवशी साजरा करतात. कष्टकऱ्यांच्या सन्मानार्थ बळीराजा गौरव दिन घराघरांत साजरा व्हावा. यासाठी शेतकरी, परिवर्तनवादी, संविधान प्रेमी नागरीकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परिवर्तनवादी साहित्यिक महादेव खुडे यांनी केले.  कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे आयोजित संविधान प्रेमी नाशिककर यांच्या वतीने सोमवारी (ता. १६) बळीराजा गौरव कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन मते होते. विचार मंचावर शेतकरी नेते रमेश औटे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे होते. प्रास्ताविक संविधान प्रेमी नाशिककरचे निमंत्रक राजू देसले यांनी केले. या प्रसंगी विद्रोही गीते स्रावसी मोहिते, संविधान गांगुर्डे, किरण मोहिते, प्रभाकर वायचळे, सागर निकम आदींनी सादर केली.     खुडे म्हणाले, ‘‘संत तुकोबांनी बळी सर्वस्वे उदार । जेणे उभारिला कर । करुनि कहार । तो पाताळी घातला ।। या अभंगाद्वारे संघर्षाचा इतिहास अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. कष्टकरी बहुजनांचे प्रबोधन जनतेच्या मुक्तीदायी चळवळीसाठी आवश्यक आहे. या निमित्ताने त्यांची वर्ग वर्ण जाती व लिंगभावविरोधी व्यापक एकजूट उभी करण्यासाठी बळीराजाचे स्मरण करणे गरजेचे आहे.’’    अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने २६, २७ व ३० नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व कार्पोरेट धार्जिण्या नव्या कायद्याच्या विरोधात देशव्यापी बंद पुकारला आहे, त्याचे जनजागृती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी किसान सभेचे सुनील मालुसरे, क्रांतिवीर छावा सेनेचे करण गायकर, आम आदमीचे ॲड. प्रभाकर वायचळे आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन मते यांनी या पुढील काळात बळीराजा गौरव महोत्सव गावागावांत सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. आरती कनोजे हिने बळीराजाची भव्य रांगोळी काढली होती. त्यानिमित्त तिचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी नाजीम काझी, आसिफ शेख, पद्माकर इंगळे, संतोष जाधव, सविता जाधव, तलाहा शेख, रामदास भोंग, किरण बोरसे, कावेरी, नितीन शिराळकर, कैलास मोरे, शिवनाथ जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर वायचळे यांनी केले. आभार पद्माकर इंगळे यांनी मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com