नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा ः भुजबळ

नाशिक : ‘‘गणेशोत्सव आनंदाने साजरे करा, मात्र नियम व अटींचे पालन करुन शांतता भंग न होतात भक्तीभावाने साजरा करावा,`` असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Celebrate Ganeshotsav by following the rules : Bhujbal
Celebrate Ganeshotsav by following the rules : Bhujbal

नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना कोरोना आणि संसर्गजन्य परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे. उत्सव आनंदाने साजरे करा, मात्र नियम व अटींचे पालन करुन शांतता भंग न होतात भक्तीभावाने साजरा करावा. तसेच या उत्सवातून कोरोनापासून बचाव कसा करता येईल, याबाबत जनजागृतीवर भर दिल्यास खऱ्या अर्थी गणेशोत्सवाचे फलीत होईल’’, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या उद्देशाने आयोजित बैठकित ते बोलत होते. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, मनपा उपायुक्त प्रदीप चौधरी उपस्थित होते. 

भुजबळ म्हणाले, ‘‘लॉकडाऊननंतर जिल्ह्यात रुग्ण संख्या अधिक वाढली असल्याने गणेशोत्सव साजरा करताना काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. नाशिक शहरात एकूण ७५० सार्वजनिक महामंडळे आहेत. किमान दिड लाखांहून अधिक घरघुती गणेश मंडळे असून या सर्व मंडळांनी सहकार्याची भुमिका दाखविली आहे. गणेशोत्सवासाठी परवानगी सहज मिळावी, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती मुर्तींच्या विक्रीसाठी मोकळी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. गणपती विसर्जनासाठी कुठल्याही प्रकारची गर्दी होवू नये, यासाठी कृत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले. 

खासदार गोडसे म्हणाले, ‘‘रस्त्यावर स्टॉल न लावता मोकळ्या जागेत लावावा. तसेच प्रभागानुसार कृत्रिम तलाव करण्यात यावे. त्यामध्ये गणेशमुर्तीचे विसर्जन करण्याबाबत नियोजन करावे.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com