maharashtra din
maharashtra din

राज्याचा आज ६० वा स्थापना दिवस 

जगभर पसरलेल्या कोरोनाच्या साथीमुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याचा ६० वा स्थापना दिन (ता.१मे) आज अत्यंत साधेपणाने पार पाडावा लागत आहे.

मुंबई: जगभर पसरलेल्या कोरोनाच्या साथीमुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याचा ६० वा स्थापना दिन (ता.१मे) आज अत्यंत साधेपणाने पार पाडावा लागत आहे. गेल्या ६० वर्षात पहिल्यांदाच राज्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. 

कोरोनाच्या साथीमुळे केवळ मंत्रालय आणि जिल्ह्यांची कार्यालये, विधीमंडळ, उच्च न्यायालये इतर सांविधानिक कार्यालये येथेच स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील दादर, शिवाजी पार्क येथील होणारा कार्यक्रम अत्यंत साधेपणानेपार पाडला जाणार आहे. राज्यात संचारबंदी लागू असल्याने स्थापना दिवसाचा दिमाखात सोहळा साजरा होणार नाही. शिवाजी पार्कवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे भाषण होणार नाही. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी राज्यपालांचे भाषण, चित्ररथ संचलन, पोलीस मानवंदना यासह इतर कार्यक्रम होणार नाहीत. या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर, मुंबई पोलीस प्रमुख किंवा मंत्रीमंडळातील एखादा सदस्य उपस्थित राहणार आहे. तर मंत्रालयात ही अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम पार पाडला जाणार असून ध्वजारोहन केले जाणार आहे. 

जिल्हास्तरावर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या मोजक्याच व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री काही कारणाने अनुपस्थित राहिले तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी ध्वजारोहन करणार आहेत. हे कार्यक्रम एकाचवेळी सकाळी आठ वाजता पार पाडले जाणार आहेत. संचारबंदी असल्याने चारपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी असल्याने या कार्यक्रमास कोणालाही निमंत्रण देण्यात येऊ नये, असे समान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानंतर १९६५ मध्ये फोर्ट भागात हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. दरवर्षी राज्याचा स्थापना दिवस, हुतात्मा स्मारक दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्यात विवीध कार्यक्रम पार पाडले जातात. मात्र यंदा या सर्व कार्यक्रमावर विरजण पडले आहे. राज्याच्या स्थापना दिवसावर कोरोनाचे सावट आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com