`डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य आजच्या पिढीसाठी आदर्श `

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती साजरी
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती साजरी

पुणे  ः शेतकरी कुटुंबातील असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवले होते. शेतकऱ्यांना एकत्रित करून सहकाराच्या माध्यमातून त्यांनी आशिया खंडातील पहिला शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना सुरू केला. सहकारातून समाजपरिवर्तन घडविणारे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे आजच्या पिढीला आदर्श ठरत आहे, असे मत कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती शनिवारी (ता. २५) शेतकरी दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात आली. पुण्यातील साखर संकुल येथे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शेतकरी दिन साजरा करण्यात आला.

या वेळी पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक मुकूंद तापकीर, निविष्ठ व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे, विस्तार संचालक अनिल बनसोडे, विजय घावटे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, पुणे विभागीय कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी दादाराम सप्रे, विनयकुमार आवटे, चंद्रकांत जगताप, बी. जे. पलघडमल, चंद्रकांत भोर आदी उपस्थित होते. या वेळी विजय कानडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com