agriculture news in Marathi celebration in Hawre bajar after padmshri announced to popatrao pawar Maharashtra | Agrowon

पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये जल्लोष

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

हिवरेबाजार ग्रामस्थांनी गेली तीस वर्षे प्रामाणिकपणे काम केले. त्याचे हे फळ आहे. लोकांनी दगड उचलले. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाण्याचा ताळेबंद तयार केला. त्यामुळे पीकपद्धतीचे नियोजन करता आले. या सर्व प्रक्रियेत राजकीय नेते व शासकीय यंत्रणेने पाठबळ दिल्यानेच हा सन्मान झाला. हा संपूर्ण गावाचा सन्मान आहे.
- पोपटराव पवार 

नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने कृषी आणि ग्रामविकास क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.  

पोपटराव पवार यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये जल्लोष करण्यात आला. पेढे, साखर वाटली. पोपटराव पवार यांची गावकऱ्यांनी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी औक्षण केले. 

सलग तीस वर्षे लोकसहभागातून ग्रामविकास, जलसंधारणाच्या कामांसह विविध उपक्रम राबवून राज्यात आणि देशात आदर्श निर्माण केला. यासाठी प्रत्येकांचे योगदान आहे. शनिवारी भारत सरकारचे सवोच्च पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यात सामाजिक कामासाठीचा पद्मश्री पुरस्कार पोपटराव पवार यांना जाहीर झाला. पोपटरावांच्या रुपाने आतापर्यंतच्या इतिहासात सरपंचाला पहिल्यांदाच पद्मश्री जाहीर झाला आहे. पद्मश्री जाहीर झाल्याचे कळताच आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये गावकऱ्यांनी जल्लोष केला. 

शनिवारी सायंकाळी उशिरा गावकऱ्यांनी पोपटराव पवार यांची सवाद्य मिरवणूक काढत गुलालाची उधळण केली. पेढे, साखर वाटली.  महिला, नागरिक, शाळकरी मुले मिरवणुकीत सहभागी झाली होते. त्यांना गावांतील महिलांनी औक्षण केले. गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. ‘‘तीस वर्षांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. गावांतील प्रत्येक माणसाच्या कामाचा हा गौरव आहे,’’ अशी भावना या वेळी पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. 

पुरस्कार मिळालेले मान्यवर
 राज्यातील बारा जणांना पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे. त्यात पोपटराव पवार (सामाजिक कार्य), राहीबाई पोपेरे (कृषी), जहीर खान (क्रीडा), कंगणा राणावत (कला), अदनान सामी (संगीत), सईद महेबूब शहा कादरी ऊर्फ सय्यदभाई (सामाजिक कार्य), सुरेश वाडकर (कला), एकता कपूर (कला), सरिता जोशी (कला), रमन गंगाखेडकर (विज्ञान व अभियांत्रिकी), करण जोहर (कला) डॉ. संड्रा देसा (वैद्यकीय) यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया
मला `पद्मश्री' सन्मान मिळाल्याचा आनंद झाला. पण हा माझ्या सहकारी महिला, बाएफ संस्था आणि मला नेहमी मदत करणाऱ्या माझ्या पतीसह कुटुंबीयांचा आणि माझ्या अकोले तालुक्‍यातील सर्व शेतकरी आणि हितचिंतकांचा सन्मान आहे. 
- राहीबाई पोपेरे 


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...