दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी'कार्यकर्त्यांचा जल्लोष

दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी'कार्यकर्त्यांचा जल्लोष
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी'कार्यकर्त्यांचा जल्लोष

सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलनास सुरवात केल्यानंतर राज्य शासनाला निर्णय घेणे अखेर भाग पडले. दुधाला प्रतिलिटर २५ रुपये इतका दर शासनाने जाहीर केल्याने आंदोलनाला मिळालेल्या विजयाचा जल्लोष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून साजरा केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींनी दूध दरवाढसाठी १६ जुलैपासून हे आंदोलन पुकारले होते. पंढरपुरातून त्याची सुरवात झाली. दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ त्यांनी मागितली होती. त्यानुसार शासनाने ही वाढ करत प्रतिलिटर २५ रुपये इतका दर जाहीर केला.

शेतकऱ्यांनी विश्‍वासाने दिलेली साथ आणि कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे हा निर्णय झाल्याचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी सांगितले. या वेळी या वेळी जिल्हा संघटक विजय रणदिवे, सचिव उमाशंकर पाटील, बिळ्यांनी सुटें, नरेंद्र पाटील, निंगप्पा पुजारी, अब्दुल रजाक मकानदार, ईक्‍बाल मुजावर, वसंत गायकवाड, तुकाराम शेतसंदी, राजू घोडके, भीमाशंकर व्हनमाने, हमीद पटेल आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com