म्हैसाळच्या मुख्य कालव्यातून उपसाबंदी

म्हैसाळच्या मुख्य कालव्यातून उपसाबंदी
म्हैसाळच्या मुख्य कालव्यातून उपसाबंदी

सांगली ः म्हैसाळ प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी उपसाबंदी लागू केली आहे. जत आणि सांगोला तालुक्‍यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. २८ मे ते २० जून या कालावधीत योजनेच्या मुख्य कालव्यातून थेट पाणीउपसा करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

वीजपंपाने किंवा सायफन पद्धतीने कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी घेता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश लागू करताच कालव्यातील पंप हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्‍यांत १५० हून अधिक पंप काढल्या आहेत. कालव्यावरील पंपांना वीजपुरवठा करू नये, असे आदेश ‘महावितरण’ला देण्यात आले आहेत.  

जत तालुक्‍यात सध्या १७५ क्‍युसेक क्षमतेने पाणीपुरवठा सुरू आहे, पण टंचाईची तीव्रता जास्त असल्याने २५० क्‍युसेकने पुरवठ्याची गरज आहे. त्यासाठी मुख्य कालव्यातील उपशावर निर्बंध आणावे लागले. शाखा कालवे, पोट कालवे, वितरिकांमधून मात्र पाणी घेता येईल. त्यामुळे जत आणि सांगोला तालुक्यांत पाणी लवकर पोचण्यास मदत होईल.  

म्हैसाळचे आवर्तन जूनअखरे पर्यंत राहणार या योजनेचे तिसरे आवर्तन सुरू आहे. पाण्याची टंचाई असल्याने शेतकऱ्यांनी योजना जून महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. कोयना आणि वारणा धरणांतील पाण्याची पातळी पाहून जून अखेर ही योजना सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पाणीपट्टी भरण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी मागितले की पाणी दिले जाते. सध्या पाणीपट्टी भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. त्यामुळे पाटबंधारे विभागातील अधिकारी शेतकऱ्यांकडे जावून पाणीपट्टीची मागणी करू लागले आहेत. अनेक गावांत बैठकाही घेत आहेत. तरी देखील पाणीपट्टी वसूल होण्यात अडचणी निर्माण होत असल्याने पाणीपट्टी भरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com