agriculture news in Marathi centenary of indigenous cotton research celebrate on tomorrow center Maharashtra | Agrowon

देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या शताब्दीपूर्ती सोहळा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील महेबूब बाग कापूस संशोधन केंद्राच्या स्थापनेस शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या संशोधन केंद्राचा शताब्दीपूर्ती सोहळा शनिवारी (ता.७) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ कापूस पैदासकार शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात येणार आहे.

परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील महेबूब बाग कापूस संशोधन केंद्राच्या स्थापनेस शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या संशोधन केंद्राचा शताब्दीपूर्ती सोहळा शनिवारी (ता.७) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ कापूस पैदासकार शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात येणार आहे.

देशी कपाशीचे संशोधन आणि विस्तारीकरणाच्या उद्देशाने परभणी येथे महेबूब बाग कापूस संशोधन केंद्राची स्थापना सन १९१८ मध्ये निजाम राजवटीत करण्यात आली. सन १९७२ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर हे संशोधन केंद्र कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत आले. स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करणारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हे एकमेव संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राच्या शताब्दी सोहळा शनिवारी (ता.७) आयोजित करण्यात आला आहे. 

कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यस्थानी राहतील.नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ.बसवराज खादी, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील माजी संचालक संशोधन डॉ. दत्तात्रय बापट, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्‍य डॉ. सुभाष बोरीकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, केंद्राचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. विजयकुमार चिंचाणे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांची उपस्थिती राहणार आहेत. 

कापूस संशोधन कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ कापूस पैदासकार डॅा. ललितादास देशपांडे, डॉ. अनिल अनसिंगकर, डॅा. एस. एस. माने, डॅा. एम. एस. शर्मा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. देशी कपाशीवर तज्ज्ञानांचे मार्गदर्शन आणि प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रक्षेत्र भेटीमध्ये प्रक्षेत्रावरील कृषी विद्यापीठ विकसित प्रसारित वाण, देशी कपाशीचे विविध प्रयोग, विविध वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम आदी पाहता येणार आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी उद्योजक आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महेबूब बाग कापूस संशोधन केंद्रांचे योगदान
महेबूब बाग येथील कापूस संशोधन केंद्रातर्फे कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वी देशी कपाशीचे गावरानी १२, गावरानी २२, गावरानी ४६ हे वाण विकसित करण्यात आले. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर देशी कपाशीचे दहा वाण विकसित करून प्रसारित करण्यात आले. यामध्ये पीए २५५, पीए ४०२, पीए ०८, पीए ५२८, पीए ७४० आणि पीए ८१२आदी वाणांचा समावेश आहे. देशी कपाशी आणि अमेरिकन कपाशी यांच्या आंतरजातीय संकरातून देशी कपाशीच्या बोंडाचा आकार आणि धाग्याची लांबी वाढविण्यात या संशोधन केंद्राला यश आले.

आंतरजातीय संकरातून देशी कपाशीचा सरळ वाण पीए ४०२ हा विकसीत करणारे देश पातळीवरील हे पहिलेच संशोधन केंद्र आहे. अमेरिकन कपाशी प्रमाणे धाग्यांचे गुणधर्म असलेले वैविध्यपूर्ण लांब धाग्याचे देशी कापूस वाण तसेच देशी कपाशीचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...