Agriculture news in marathi Center declares ten thousand nine hundred crore for Food Processing Industries | Page 2 ||| Agrowon

अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९०० कोटींचे अनुदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 एप्रिल 2021

देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (पीएलआय) सुमारे १० हजार ९०० कोटींचे अनुदान (सबसिडी) देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.३१) घेतला.

नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (पीएलआय) सुमारे १० हजार ९०० कोटींचे अनुदान (सबसिडी) देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.३१) घेतला. या दूरगामी निर्णयामुळे पीआयएल क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवरील "ब्रॅण्ड' म्हणून सिद्ध होण्यास तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढण्यास मोठी मदत होईल असे माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएलआय ला अनुदानाचा डोस देण्याबाबतचा एकच ठळक निर्णय करण्यात आला. जावडेकर व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाचा सातत्याने विस्तार होत असल्यामुळे यासाठी केंद्राने सबसिडी द्यावी अशी मागणी या मंत्रालयाच्या माजी मंत्री व अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनीही अनेकदा केली होती. गेली सहा वर्षे हे पद सांभाळणाऱ्या कौर यांनी कृषी कायद्यांना संसदेत मंजुरी मिळाल्याच्या निषेधार्थ नुकताच राजीनामा दिला. केंद्र सरकारने पीआयएल प्रोत्साहन योजनेअंतर्गत या क्षेत्रासाठी भरघोस सबसिडीची घोषणा केली. 

जावडेकर व गोयल यांनी सांगितले की पीआयएलबाबतच्या केंद्राच्या निर्णयामुळे आगामी काळात या क्षेत्रात किमान अडीच लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा निर्णय शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे कारण कृषी कायद्यांच्या पुढील पायरीवरील अन्नप्रक्रिया उद्योगाच्या सर्वंकष विस्तारासाठी तो पूरक आहे. जेव्हा भारतातील प्रक्रियाकृत अन्नपदार्थ जगभरात जास्तीत जास्त निर्यात होऊ लागतील तेव्हा स्वाभाविकपणे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. 

केंद्राने २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात १२ ते १३ क्षेत्रांसाठी पीएलआय योजना आणण्याचा निर्णय घेतला होता. देशातील ६ क्षेत्रांसाठी याआधीच पीआयएल लागू करण्यात आली आहे. ताज्या निर्णयामुळे मूल्यवर्धित खाद्यान्न कृषी उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल, निर्यातीत वाढ होईल व शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना उचित भाव मिळण्याबरोबरच मोठ्या संख्येने रोजगारही या क्षेत्रात निर्माण होतील असेही जावडेकर यांनी सांगितले. 
 
 


इतर अॅग्रो विशेष
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...