agriculture news in marathi, Center ready to purchase all Ethanol Says Nitin Gadkari | Agrowon

सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची तयारी : गडकरी
वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला वाचविण्यासाठी कारखान्यांनी आता साखरेबरोबर उपउत्पादनांच्या निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. केंद्र शासन आता इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मिती आणि वापराला मोठी चालना देत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या निर्मितीवर अधिकाधिक भर द्यावा. कारखान्यांकडील सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची तयारी आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला वाचविण्यासाठी कारखान्यांनी आता साखरेबरोबर उपउत्पादनांच्या निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. केंद्र शासन आता इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मिती आणि वापराला मोठी चालना देत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या निर्मितीवर अधिकाधिक भर द्यावा. कारखान्यांकडील सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची तयारी आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

 राज्यातील साखर कारखान्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील विधानभवनात बैठक झाली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, रोहयो मंत्री जयकुमार रावल, कामगार मंत्री संभाजी पाटील–निलंगेकर,  राज्यमंत्री विजय शिवतारे, विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे–पाटील, विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे–पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,  माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे, एकनाथ खडसे, आमदार गणपतराव देशमुख, जयंत पाटील, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू आदींसह साखर कारखान्याशी संबंधित आमदार यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. गडकरी म्हणाले, सध्या आपण 8 लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो. हा भार कमी करण्यासाठी इथेनॉलच्या वापरावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. याबाबत महाराष्ट्र शासनानेही एक धोरण निश्चित करावे, असे ते म्हणाले.

इथेनॉलबाबत धोरण निश्चित करु - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, कारखाने टिकले तर ऊस उत्पादक शेतकरी टिकणार आहे. यासाठी कारखान्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे शासनाचे धोरण आहे. इथेनॉल खरेदीबाबत केंद्र शासनाचे धोरण निश्चित झाल्यानंतर त्या अनुषंगाने राज्य शासनही सकारात्मक असे धोरण निश्चित करेल. साखर कारखान्यांमार्फत इथेनॉल तसेच विजेच्या निर्मितीला चालना देणे आणि त्यामार्फत साखर उद्योगाला चालना देणे, ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळवून देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे ते म्हणाले.  

यावेळी साखर कारखान्यांच्या विविध प्रश्नांबाबत समग्र चर्चा झाली.

#Ethanol #Nitin_Gakari #Sugarcane #Sugar

इतर अॅग्रो विशेष
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...
विषबाधेबाबत गांभीर्य कधी?घटना क्रमांक १ ः तारीख - ४ मे २०१९, ठिकाण -...
समवर्ती लेखापरीक्षणातूनच टळतील...इ.स. पूर्व सहाव्या शतकापूर्वी प्राचीन इजिप्शियन...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...