Agriculture News in Marathi The Center should reverse anti-farmer decisions | Agrowon

केंद्राने शेतकरीविरोधी निर्णय मागे घ्यावेत 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांचा प्रश्न अजून मार्गी लागला नसताना केंद्र शासनाने नुकतेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील आणखी तीन निर्णय घेतल्याने या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

उजनी. जि. लातूर: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांचा प्रश्न अजून मार्गी लागला नसताना केंद्र शासनाने नुकतेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील आणखी तीन निर्णय घेतल्याने या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने येथील शेतकऱ्यांची पोरं संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करणारे जवळपास चार हजार पाचशे निवेदने गोळा केली आहेत. मंगळवारी (ता.१२) संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी ती निवेदने दिल्लीतील कृषी मंत्रालयात दाखल केली. 

केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारपेठेत येण्याच्या वेळेस सोयाबीन पेंड आयातीस परवानगी दिली. त्यासोबतच सोयातेलवरील आयात शुल्कही कमी केले. तसेच आता सोयाबीन साठवणुकीवर मर्यादा लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बाजारातील सोयाबीनचे भाव ११ हजारांवरून पाच हजारांवर आले आहेत. सगळीकडे सोयाबीनचा तुटवडा असताना या वेळी तरी शेतीमालाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु त्या आधीच सरकारने व्यापारी हित जोपासणारे निर्णय घेतले. सोयाबीनचे दर चांगले असतानाही त्याचा व्यापाऱ्यांनाच फायदा झाला.

केंद्र शासनाच्या अशा चुकीच्या धोरणांचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे, असा आरोप करून मोदी सरकारने आपले हे तीन निर्णय मागे घ्यावेत, यासाठी येथील शेतकऱ्याची पोरं संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांच्या पुढाकाराने उजनी (ता. औसा) परिसरातील एकंबी, गुळखेडा, आंदोरा, वडजी, जायफळ, चिंचोली आदी गावांतून शेतकऱ्यांकडून निवेदने गोळा करण्यात आली होती. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे खासगी सचिव मुकेश कुमार बन्सल यांची भेट घेऊन तब्बल साडेचार हजार निवेदने त्यांना सादर करण्यात आली. संबंधित निर्णय मागे घेण्याची विनंती त्यांनी केली आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.  


इतर बातम्या
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...