केंद्राकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी : चंद्राबाबू

केंद्राकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी : चंद्राबाबू
केंद्राकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी : चंद्राबाबू

अमरावती, आंध्र प्रदेश : केंद्र सरकारकडून आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी (ता.२१) केला आहे. मात्र आपण अशा प्रकारच्या धमक्‍यांना भीत नाही, असे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक "नकारात्मक नेते' असून, त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची पीछेहाट होत असल्याचाही आरोप नायडू यांनी केला. तेलुगू देसमच्या नेत्यांना आज टेलिकॉन्फरसिंगद्वारे मार्गदर्शन करताना नायडू बोलत होते. नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने आंध्रसाठी काहीच केले नाही, असे नायडू म्हणाले. ते म्हणतात, दर आठवड्याला केंद्राचा मंत्री राज्यात येईल; परंतु मी विचारू इच्छितो, की त्यांनी राज्यासाठी काय चांगले केले? असे असतानाही आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली जात आहे. पण आंध्रातील कोणतीही व्यक्ती त्यांच्या धमकीला भिणार नाही, असे चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले. तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याची टीका नायडू यांनी केली. टीआरएस आणि वायएसआरसी पक्ष हे राज्यातील मागासवर्गीयांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. अशा प्रकारच्या समाजविघातक शक्तींपासून मागासवर्गीयांनी दूर राहावे, असे आवाहन नायडूंनी केले. दोन दिवसांपूर्वी कोलकता येथे ममता बॅनर्जी यांच्या एकता रॅलीत सहभागी झालेल्या चंद्राबाबू नायडू यांनी हुकूमशाही राजवटीच्या अंताची सुरवात असल्याचे म्हटले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com