agriculture news in Marathi center use power over farmer agitaiton Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकरी मोर्चावर केंद्राकडून दडपशाही : किसान सभा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी मोर्चावर केंद्र सरकारकडून अमानुष दडपशाही करण्यात येत आहे.

नगर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी मोर्चावर केंद्र सरकारकडून अमानुष दडपशाही करण्यात येत आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दिल्लीकडे निघालेल्या देशभरातील शेतकऱ्यांना विविध राज्यांच्या सीमांवर अडविण्यात येत आहे. अनेक शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. किसान सभेच्या केंद्रीय नेत्यांना अटक केले जात आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने किसान सभेने निषेध केला आहे. 

किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, किसान संघर्ष समन्वय समितीने या आंदोलनाची पूर्वकल्पना केंद्र सरकारला दिलेली होती. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश मधील विविध संघटनांच्या वतीनेही सरकारला निवेदने देऊन आंदोलनाची पूर्वकल्पना महिन्याभरापूर्वीच देण्यात आली होती. 

बलिप्रतिपदा दिनी महाराष्ट्रातून पंतप्रधानांना किसान सभेच्या नेतृत्वाखाली लेटर टू पी.एम. मोहिमेअंतर्गत हजारो पत्रे पाठवून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या कळविल्या होत्या. शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी शेतीमालाची अनिर्बंध आयात बंद करा, शेतीमालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे व व्यापाराचे स्वातंत्र्य द्या, सर्व प्रकारच्या शेतीमालाला दीडपट रास्त भावाची हमी द्या, कसत असलेल्या जमिनी कसणारांच्या नावे करा या मागण्या शेतकरी गेली दोन महिने सातत्याने करत होते.

या संपूर्ण काळात शेतकरी संघटनांबरोबर चर्चा करून हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. केंद्र सरकारने मात्र या ऐवजी प्रत्यक्ष मोर्चा निघाल्यानंतर दडपशाही करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सरकारची ही कृती लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. 


इतर अॅग्रो विशेष
थंडी कायम राहण्याची शक्यता पुणे ः कोरड्या झालेल्या वातावरणामुळे राज्यातील...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...