केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय ः पृथ्वीराज चव्हाण

अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा वाचवू शकेल. देशात फक्त कृषी अर्थव्यवस्था स्वबळावर शेतकऱ्यांनी सुरू ठेवली आहे. त्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
From the center on the wrists of farmers: Prithviraj Chavan
From the center on the wrists of farmers: Prithviraj Chavan

कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा वाचवू शकेल. देशात फक्त कृषी अर्थव्यवस्था स्वबळावर शेतकऱ्यांनी सुरू ठेवली आहे. त्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (ता. ६) कऱ्हाड (जि. सातारा) येथे केला.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गडगडले असतानाही त्याचा फायदा नागरिकांना देण्याऐवजी मोदी सरकारने अर्थव्यवस्थेतील तूट भरून काढण्यासाठी डिझेल-पेट्रोलची दरवाढ केली, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने ८२० टक्क्यांनी डिझेलवर वाढ केली आहे. डिझेल-पेट्रोलचे दर वाढवल्याने सहा वर्षांत मोदी सरकारने कर वाढवून १८ लाख कोटी रुपये मिळवले आहेत. डिझेलची दरवाढ केल्याने दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दरवाढ झाली आहे. तेलाचे दर कमी करून सामान्यांना दिलासा देणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी भाववाढ करून आर्थिक तूट भरून काढण्याचे काम सुरू आहे. लॉकडाऊनबाबत मोदी सरकारमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू सुरू होणार आहेत की नाही याबाबत स्पष्टता नाही. लोकांच्या रोजीरोटीवर काय परिणाम होतोय याचा विचार केंद्र सरकारकडून होत नाही. देशात सहमतीचे राजकारण होताना दिसत नाही.  

मग सैनिक शहीद कसे झाले? भारत-चीन सिमवेर सध्या वाद सुरू आहे. पंतप्रधान मोदी हे चीन सैन्य भारतीय हद्दीत घुसले नाहीत असे सांगत आहेत. मग भारतीय सैनिक शहीद कसे झाले? याचे उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे. संसदेचे अधिवेशन बोलवून, विरोधी पक्षाबरोबर सहमती करुन त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. मात्र पंतप्रधान मोदी चर्चेला जायला तयार नाहीत. त्यामुळे देशात एकाधिकारशाहीचे काम सुरू आहे.

१०० युनीट मोफत वीजेची मागणी वीजेची मागील तीन महिन्यांची वीज बिलांचे रिडींग घेता आले नाही. बिले सरासरी करुन देण्यात आले आहेत. मध्यंतरी वीज आयोगाने वीजेची दरवाढ केली होती. त्या सर्वांचा विचार करुन मुख्यमंत्री, उर्जामंत्र्यांशी चर्चा करुन त्यावर काही सुट देता येईल का यावर विचार सुरू आहे, असे सांगूण आमदार चव्हाण यांनी आमची तर १०० युनीट वीज मोफत द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com