केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार विरोधी : गणेश देवी

केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि कामगार विधेयके ही शेतकरी-कामगार विरोधी आहेत. करार शेतीविरोधात प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘एक गाव, एक ठराव’ करावा. राज्यात एक लाख ठराव करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहे :गणेश देवी
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार विरोधी : गणेश देवी
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार विरोधी : गणेश देवी

पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि कामगार विधेयके ही शेतकरी-कामगार विरोधी आहेत. करार शेतीविरोधात प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘एक गाव, एक ठराव’ करावा. राज्यात एक लाख ठराव करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहे, अशी माहिती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांनी माध्यमांना दिली.

विधेयकांच्या विरोधातील श्री. देवी यांची शेतकरी संवाद यात्रा मंगळवारी (ता.२९) पुण्यात आली होती. यावेळी देवी यांनी पुणे बाजार समितीमधील शेतकरी, व्यापारी, कामगार, अडते यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, सुभाष वारे, संतोष नांगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

देवी म्हणाले,‘‘केंद्र सरकारने कृषी पणन विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचे सांगत गैरसमज पसरविला आहे. प्रत्‍यक्षात ही विधेयके शेतकरी विरोधी असून, कायद्याने शेतकरी संरक्षणाशिवाय राहणार आहे. यासाठी आमची शेतकरी संवाद यात्रा सुरु असून, प्रत्येक ग्रामपंचायतीने या करार शेतीविरोधात ‘एक गाव, एक ठराव’ करण्याची गरज आहे. यासाठी आम्ही पुढाकार घेत एक लाख ठराव करणार आहोत. या ठरावांमुळे केंद्र सरकारला विधेयकांमध्ये बदल करावा लागणार आहे.

डॉ. आढाव म्हणाले,‘‘केंद्र सरकारमध्ये एकही मंत्री शेतकरी नाही. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे हित समजणार नाही. हे सरकार व्यापारी धार्जिणे सरकार असून, या विधेयकांना आमचा विरोध असणार आहे.’’ आज नाशिकमध्ये यात्रा आज (ता.३०) नाशिक, वाशी मध्ये श्री. देवी यांची यात्रा बुधवारी (ता.३०) नाशिक येथे साडे अकरा वाजता तर वाशी (नवी मुंबई) येथे सायंकाळी पाच वाजता असणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com