केंद्रीय अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांच्या नजरा

केंद्रीय अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांच्या नजरा
केंद्रीय अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांच्या नजरा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या, देशभरातील शेतकरी आणि संलग्न क्षेत्राच्या अपेक्षा लागून असलेला केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत सादर होणार आहे. मात्र लेखानुदानास मर्यादा असल्याने मोदी सरकार लोकप्रिय घोषणांसाठी कशी कसरत करते, याकडे आता अभ्यासकांचे लक्ष लागून आहे.  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे कर्करोगावरील उपचारासाठी अमेरिकेत गेलेले आहेत. त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आज (ता. ३१) लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातून भाजपला मोठा फटका बसला होता. कॉंग्रेसने लोकप्रिय घोषणा करून राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सत्तापरिवर्तन घडविले. संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकार धाडसी घोषणा करण्याचे संकेत मंत्रिमंडळातून यापूर्वीच मिळाल्याने संपूर्ण देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com