सोलापुरातील केंद्र, राज्य शासनाची कार्यालये १४ एप्रिलपर्यंत बंद 

सोलापूर: ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) व (३) नुसार सुधारीत आदेश जारी केले. या आदेशानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील अत्यावश्यक सेवेतील कार्यालये वगळून सर्व कार्यालये १४ एप्रिपर्यंत बंद राहतील.
Central and State Government offices in Solapur are closed till 14th April
Central and State Government offices in Solapur are closed till 14th April

सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) व (३) नुसार सुधारीत आदेश जारी केले. या आदेशानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील अत्यावश्यक सेवेतील कार्यालये वगळून सर्व कार्यालये १४ एप्रिपर्यंत बंद राहतील.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशानुसार केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील कार्यालये बंद राहतील. मात्र, संरक्षण, केंद्रीय पोलिस दल, ट्रेझरी, सार्वजनिक उपक्रम (पेट्रोलियम, CNG, LPG, PNG) आपत्ती व्यवस्थापन, उर्जा निर्मिती व वाहन करणारे विभाग, पोस्ट ऑफिसेस, राष्ट्रीय सूचना केंद्रे सुरु राहतील. तसचे राज्य शासनाची कार्यालये, स्वायत्त संस्था व महामंडळे बंद राहतील. 

तसेच पोलिस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि तुरुंग सेवा, वन विभागाकडील सर्व प्राणी संग्रहालये, नर्सरी, वन्य जीव, जंगलातील आग विझवणारी यंत्रणा, वृक्षारोपणाची जोपासणा, गस्ती पथक, समाज कल्याण विभागाकडील बाल गृहे, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक, निराधार, स्त्रिया,  विधवा इत्यादींची निरीक्षण गृहे, जिल्हा प्रशासन, ट्रेझरी, वीज, पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता, महानगरपालिका, नगरपालिका- अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असणारे कर्मचारी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन ही कार्यालये सुरू राहतील. 

जिल्ह्यातील सर्व प्रवाशांच्या हालचालीसाठी राज्याची व जिल्ह्याची सीमा बंद करण्यात येत आहे. सर्व प्रकारची वाहतूक खासगी यंत्रणेसह बंद करण्यात येत आहे. मात्र महत्वाच्या जीवनावश्यक वस्तू व वस्तूंची वाहतूक चालू राहील. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. परंतु वैद्यकीय तातडीच्या कारणासाठी आवश्यक असणारी वाहतूक व्यवस्था चालू राहील. 

खासगी वाहनांचा वापर जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा, आणि अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या बाबी याकरीता वाहन चालकाव्यतिरिक्त एका व्यक्तीला करता येईल. लोक एकत्र जमतील अशा सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com