बीटी बियाणे दरात पाच टक्के वाढ..

केंद्र सरकारने या वर्षीच्या हंगामासाठी बीजी-१ आणि बीजी-२ कपाशी बियाणे दरात पाच टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीजी-१ बीटी पाकीट ६३५ रुपयांना, तर बीजी-२ पाकिटांची किंमत ७६७ रुपये करण्यात आली आहे
बीटी बियाणे दरात पाच टक्के वाढ
बीटी बियाणे दरात पाच टक्के वाढ

नागपूर : केंद्र सरकारने या वर्षीच्या हंगामासाठी बीजी-१ आणि बीजी-२ कपाशी बियाणे दरात पाच टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीजी-१ बीटी पाकीट ६३५ रुपयांना, तर बीजी-२ पाकिटांची किंमत ७६७ रुपये करण्यात आली आहे. त्या संदर्भातील राजपत्र बुधवारी (ता. ३१) प्रसिद्ध करण्यात आले.  बियाणे कंपन्यांकडून बीटी बियाणे दरात वाढीची मागणी होती. नॅशनल सीड असोसिएशनने केंद्र सरकारस्तरावर त्यासाठी पाठपुरावा केला होता. सध्या बीजी-१ तंत्रज्ञान रॉयल्टीविना उपलब्ध करून दिले जात आहे. बीजी-२ वरील रॉयल्टीची आकारणी मात्र कायम आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात बीजी-१ कपाशी बियाण्याचे पाकीट ६३० रुपयांना, तर बीजी-२ चे पाकीट ७३० रुपयांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.   या वर्षी मात्र बीटी बियाणे पाकीट दरात सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. बीजी-१ बीटी पाकीट ६३५ रुपयांना, तर बीजी-२ पाकिटांची किंमत ७६७ रुपये करण्यात आली आहे.  बियाणे उद्योगाकडून या दरवाढीचे स्वागत करण्यात आले असून, या माध्यमातून संशोधन आणि विकास कार्यासाठी पैसा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र ही दरवाढ पुरेशी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरासरी दहा टक्के दरवाढ हवी, अशी बियाणे उद्योगाची मागणी आहे.  प्रतिक्रिया... ‘‘बियाणे दरात कपात करण्यात आल्याने कंपन्यांचे संशोधन आणि विकासकार्य प्रभावी झाले होते. नवे वाण संशोधनकार्यासाठी देखील पैशाची उपलब्धता करण्याचे आव्हान होते. त्यामुळे केंद्र सरकारकडे नॅशनल सीड असोसिएशनने सरासरी दहा टक्के दरवाढीची मागणी केली होती. केंद्र सरकारने या मागणीची दखल घेत या वर्षी पाच टक्के दरवाढ केली आहे.  त्याचे आम्ही स्वागत करतो.’’  - आर. के. त्रिवेदी मुख्य प्रवर्तक, नॅशनल सीड असोसिएशन, दिल्ली महाराष्ट्रात ४२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. त्यामध्ये ९५ टक्के बीटी बियाणे आहे. एकरी दोन पाकिटांची गरज राहते. त्यानुसार सरासरी एक कोटी ५० लाख पाकिटे महाराष्ट्रात विकली जातात. गेल्या वर्षी ३५ लाख पाकिटे हर्बीसाइड टाॕलरंट (तणाला प्रतिकारक) बियाण्याची अनधिकृतपणे विकली गेली, अशी माहिती आहे. त्याचा बियाणे कंपन्यांना मोठा फटका बसला. नव्या दरवाढीमुळे कंपन्यांना दिलासा मिळाला असला, तरी कापूस उत्पादन खर्चात मात्र वाढ होणार आहे.  - गोविंद वैराळे,   ज्येष्ठ कापूस अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com