हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढ

केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे हमीभाव आज (ता.१) जाहीर केले आहेत. यात कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७०, भातात ५३, तूरीत २००, मूगात १४६ तर उडीदात ३०० रुपये गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ केली आहे.
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढ
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे हमीभाव आज (ता.१) जाहीर केले आहेत. यात कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७०, भातात ५३, तूरीत २००, मूगात १४६ तर उडीदात ३०० रुपये गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (ता.१) निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बैठकीनंतर हमीभावाच्या निर्णयाची माहिती दिली. कृषिमंत्री तोमर म्हणाले,‘‘केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने देशातील १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास मंजूरी दिली आहे.’’

एमएसपी २०२०-२१ (प्रतिक्विंटल/रूपयात)  (कंसात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ)

  • भात/धान : १८६८ (+५३)
  • भात/धान (ए ग्रेड) : १८८८ (+५३)
  • ज्वारी : २६२० (+७०)
  • ज्वारी मालदांडी : २६४० (+७०)
  • बाजरी : २१५० (+१५०)
  • नाचणी : ३२९५ (+१४५)
  • मका : १८५० (+९०)
  • तूर : ६००० (+२००)
  • मूग : ७१९६ (+१४६)
  • उडीद : ६००० (+३००) 
  • भूईमुग : ५२७५ (+१८५) 
  • सूर्यफूल : ५८८५ (+२३५) 
  • सोयाबीन : ३८८० (+१७०) 
  • तीळ : ६८५५ (+३७०) 
  • खुरासणी : ६६९५ (+७५५) 
  • कपाशी (मध्यम धागा) : ५५१५ (+२६०)
  • कपाशी लांब धागा : ५८२५ (+२७५)
  • पंतप्रधान मोदी यांचे ट्वीट.. ‘‘जय किसान हा मंत्र पुढे नेत केंद्रीय मंत्रिमंडळात शेतकऱ्यांकरिता काही महत्वाचे निर्णय आज घेतले आहेत. १४ खरीप पिकांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट वाढ ही किमान आधारभूत मुल्यात निर्धारित करण्यात आली आहे. याशिवाय तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदत कर्जाची मुदत वाढविण्यात आली आहे’’

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com