agriculture news in marathi Central cabinet approves Pesticide management bill 2020 | Agrowon

कीडनाशकांमधील फसवणुकीला आळा; विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूर

वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : सुरक्षित आणि परिणामकारक कीडनाशके विक्री, शेतकरी संरक्षण असे महत्त्वाचे मुद्दे असलेल्या ‘कीडनाशके व्यवस्थापन विधेयक २०२०’ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. संसदेच्या विद्यमान अधिवेशनात विधेयक मांडले जाणार आहे. 

नवी दिल्ली : सुरक्षित आणि परिणामकारक कीडनाशके विक्री, शेतकरी संरक्षण असे महत्त्वाचे मुद्दे असलेल्या ‘कीडनाशके व्यवस्थापन विधेयक २०२०’ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. संसदेच्या विद्यमान अधिवेशनात विधेयक मांडले जाणार आहे. 

पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी (ता.१२) ही माहिती दिली. मंत्री जावडेकर म्हणाले, ‘‘कीडनाशके व्यवस्थापन विधेयक २०२० याच अधिवेशनात मंजूर झाल्यानंतर उत्पादक कंपन्या मनमानी दराने शेतकऱ्यांना कीटकनाशके विकू शकणार नाहीत. नव्या कायद्याद्वारे १९६८ च्या मूळ कायद्यात महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. प्रस्तावित कायद्यानुसार कीडनाशकांचे उत्पादन, आयात-निर्यात, किमतींची निश्‍चिती, साठवणूक, जाहिराती, वाहतूक व वितरणाच्या व्यवस्थापनाबाबतचे नवे नियम असतील. शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून वाचवून रास्त दरात कीडनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी सरकार हे विधेयक आणणार आहे.’’

विद्यमान ‘कीडनाशके कायदा १९६८’ या ऐवजी नवे ‘कीडनाशके व्यवस्थापन विधेयक २०२०’ देशात लागू होण्याची शक्यता आहे. मंत्री जावडेकर म्हणाले,‘‘नव्या कायद्यानुसार कंपन्यांनी कीडनाशकाची जैविक क्षमता, सुरक्षितता, वापराविषयीच्या सूचना आणि साठवणूक करण्यासंदर्भातील पायाभूत सुविधा याबाबत संपूर्ण माहिती देणे आवश्‍यक असेल.  दुय्यम दर्जाच्या किंवा बनावट कीडनाशकांमुळे पिकाला किंवा शेतीचे नुकसान झाल्यास त्याकरिता शेतकऱ्यांस नुकसानभरपाई देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली.’’  

‘‘सर्व भाषांमध्ये व डिजिटल स्वरूपात कीडनाशकांसंदर्भातील सर्व माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध असेल. जेणे करून शेतकऱ्यांना कीडनाशकांच्या वापरासंदर्भात योग्य निर्णय घेणे शक्य होईल. कीडनाशकांच्या जाहिरातीत कंपनीस कोणताही चुकीचा दावा करता येणार नाही. बनावट उत्पादनांमुळे कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची तरतूद नव्या विधेयकात करण्यात आली आहे,’’ असे मंत्री जावडेकर यांनी स्पष्ट केले. 

भारत हा आशियातील आघाडीचा कीडनाशक उत्पादक देश आहेत. देशांतर्गत बाजार पेठांत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाना या राज्यांत कीडनाशकांचा सर्वाधिक वापर होतो.


इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...