इथेनॉलच्या दरात १.४७ रुपया वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉलनिर्मितीला चालना देत किमतीत प्रति लिटर १.४७ रुपयापर्यंत वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींविषयी मंत्रिमंडळ समितीने बुधवारी (ता.१०) हा निर्णय घेतला.
इथेनॉलच्या दरात १.४७ रुपया वाढ
इथेनॉलच्या दरात १.४७ रुपया वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉलनिर्मितीला चालना देत किमतीत प्रति लिटर १.४७ रुपयापर्यंत वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींविषयी मंत्रिमंडळ समितीने बुधवारी (ता.१०) हा निर्णय घेतला.

डिसेंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात तेल कंपन्या वाढीव दराने इथेनॉल खरेदी करतील. उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत सध्या असणाऱ्या ६२.६५ रुपये प्रति लिटरवरून ६३.४५ रुपये करण्यात आली. सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत ४५.६९ रुपये प्रति लिटरवरून ४६.६६ रुपये, तर बी-हेवीपासून बनणाऱ्या इथेनॉलची किंमत ५७.६१ रुपये प्रति लिटरवरून ५९.०८ रुपये करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या २०२१-२२ या मार्केटिंग वर्षासाठी या किमती असतील. पेट्रोल मध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्याच्या उद्दिष्टाचा भाग म्हणून या किमती वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे जास्त मिश्रण केल्यास तेल आयातीवरील बोजा कमी होईल, याच बरोबर ऊस उत्पादक शेतकरी, तसेच साखर कारखान्यांनाही फायदा होईल. या उद्देशाने इथेनॉलच्या किमती वाढवण्यात आल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले.

२०२०-२१ या मार्केटिंग वर्षात (डिसेंबर२० -नोव्हेंबर २१) पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण ८ टक्क्यांवर पोहोचले. पुढील वर्षी ते १० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. २०२५ पर्यंत मिश्रण २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. तेल विपणन कंपन्या सरकारने ठरवलेल्या किमतीवर इथेनॉल खरेदी करतात. इथेनॉलच्या किमती वाढल्याने इथेनॉलनिर्मितीला बळ मिळेल, असे मंत्री श्री. ठाकूर म्हणाले.

प्रतिक्रिया.. केंद्राने इथेनॉल दरवाढीचा अपेक्षित निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात इंधनाच्या दरवाढीवर इथेनॉलच्या किमती अन्य देश ठरवत असतात. केंद्राने मात्र उसाची एफआरपी निगडित धरून इथेनॉलच्या किमतीतही वाढ केली. याचा अनुकूल परिणाम इथेनॉल प्रकल्पांची क्षमता, निर्मिती व वापर वाढण्यावर होऊ शकतो. याचा फायदा साखर उद्योगासाठी निश्‍चित होईल. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com