agriculture news in marathi, central cotton research institute doing inspection of bollworm, nagpur, maharashtra | Agrowon

केंद्रीय कापूस संशोधन संस्था नोंदवतेय बोंड अळीचे निरीक्षण

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

बोंड अळी प्रादुर्भावाची स्थिती जाणून घेण्याकरिता व पूरक शिफारसींच्या अनुषंगाने संस्थेच्या तज्ज्ञांद्वारे सध्या काही जिल्ह्यांत दौरे सुरू आहेत. यवतमाळ, वाशीम जिल्ह्यात या अनुषंगाने नुकतीच पाहणी करण्यात आली. इतर जिल्ह्यांतही निरीक्षण नोंदविण्याचे काम होणार आहे.
- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

नागपूर  ः फुलावर असलेल्या कापूस पिकावर सुरवातीलाच मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा केला जात होता; परंतु फुलधारणेच्या काळात कापसावर किती प्रादुर्भाव झाला याची नेमकी टक्‍केवारी जाणून घेण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने विविध जिल्ह्यांतील प्रक्षेत्रांना भेटी दिल्या जात आहेत.

फुलअवस्थेतील कापूस पिकावर काही जिल्ह्यांत ५०, काही जिल्ह्यांत ८० टक्‍के बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याची चर्चा होत होती. याचवेळी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. सी. डी. मायी यांनी १० ते १२ टक्‍केच प्रादुर्भाव असल्याचे सांगितले होते. शेतकऱ्यांमध्येदेखील नेमका प्रादुर्भाव किती झाला, याविषयी मतभिन्नता होती. हा गोंधळ दूर व्हावा याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने जिल्हानिहाय सर्व्हेक्षणाची मोहीम हाती घेतल्याची माहिती आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ सध्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या माध्यमातून संबंधित जिल्ह्यांत बोंड अळीचा प्रादुर्भाव किती आणि कोणत्या स्तरावर आहे, याविषयी जाणून घेता येणार आहे. वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात संस्थेच्या तज्ज्ञांनी दौरे करून या संदर्भाने माहिती घेतल्याचे सांगण्यात आले.


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...