agriculture news in marathi, central cotton research institute gives clean cheat to ankur seeds,nagpur, maharashtra | Agrowon

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेची ‘अंकुर सीड्स’ला क्‍लीन चिट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सुरवातीला प्रोटीन चाचणी करण्यात आली. त्या वेळी बियाण्याचे केवळ दहा नमुनेच घेण्यात आले. त्यात एच.टी. जनुकाचा ३० टक्‍के तथ्यांश आढळला होता. परंतु चाचणीची ही पद्धत चुकीची असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या वेळी १०० बियाणे नमुने घेऊन  डीएनए चाचणी केली असता त्यात एच.टी. जनुक आढळून आले नाही. त्यामुळे या वाणात एच.टी. जनुक नसल्याचा दुसरा अहवाल देण्यात आला आहे. या संदर्भाने कृषी विभागालादेखील कळविण्यात आले आहे. या प्रकरणी सुरवातीच्या अहवालावरुन पोलिस तक्रार झाल्याचीदेखील मला माहिती आहे.
- डॉ. बालसुब्रमण्यम, प्रयोगशाळा प्रमुख, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

नागपूर ः मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेडच्या ३०२८ या वाणात निघालेल्या एच.टी. जनुक प्रकरणाने अल्पावधीतच नाट्यमय वळण घेतले आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या अहवालावरूनच या प्रकरणात सुरवातीला पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यांनतर आता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या दुसऱ्या अहवालात एच.टी. संदर्भाने क्‍लीन चिट देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे कृषी विभागाच्या अडचणींमध्ये मात्र वाढ झाली आहे.

या वर्षी कृषी विभागाने हंगामाच्या सुरवातीला राज्य स्तरावर सर्वच कृषी निविष्ठांचे कंपन्यांच्या गोदामातच नमुने घेतले होते. मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेड कंपनीचे बियाणे प्रक्रिया केंद्र मलकापूर (जि. बुलडाणा) येथे आहे. कंपनीच्या मलकापूर येथील गोदामातून कृषी विभागाने १५ मे २०१८ रोजी नमुने घेतले. हे नमुने २५ मे २०१८ रोजी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे पृथक्करणासाठी पाठविण्यात आले. १९ जुलैला याचा अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून कृषी विभागाला मिळाला. त्यामध्ये ३०२८ या वाणात ३० टक्‍के एच.टी. जनुकाचा अंश असल्याचा धक्‍कादायक खुलासा करण्यात आला होता.

याची कृषी विभागाने गांभीर्याने दखल घेत तातडीने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच उपप्रादेशिक व्यवस्थापक चिरंजीव रेड्डी यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. मलकापूर (जि. बुलडाणा) पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. पोलिसांचा तपास सुरू असतानाच कृषी विभागानेदेखील मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेडला नोटीस बजावली. परवान्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्यामुळे खुलासा करण्याचे यातून सांगण्यात आले.

ही सारी प्रक्रिया सुरू असतानाच अचानक  शनिवारी (ता. ४) रात्री केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने नवा अहवाल कृषी विभागाला ई-मेलद्वारे पाठविला. त्यामध्ये अंकुर सीड्स प्रा. लिमिटेड या कंपनीच्या ३०२८ या वाणात एच.टी. जनुकाचा अंश नसल्याचे नमूद आहे. या अहवालामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...
पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर...आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट...
परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील...
पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९०...लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर,...
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
नारळ बागेत आंतरपिके फायदेशीरसुरवातीच्या काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...