agriculture news in marathi Central declares Padmashri awards to Popatrao pawar, Rahibai popare | Agrowon

पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 जानेवारी 2020

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५) विविध पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील सहा जणांना पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.  यात देशी बियाणे संवर्धक राहिबाई सोमा पोपेरे (कृषी- महाराष्ट्र) , चिंताला वेंकट रेड्डी (कृषी - तेलंगण),  राधामोहन व साबरमती (संयुक्तपणे) (कृषी- ओडिशा), बटकृष्ण साहू (पशुसंवर्धन- ओडिशा) , त्रिनीती साईऊ (कृषी- मेघालय) यांच्यासह सामाजिक कार्य क्षेत्रासाठी महाराष्ट्रातील आदर्शग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५) विविध पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील सहा जणांना पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.  यात देशी बियाणे संवर्धक राहिबाई सोमा पोपेरे (कृषी- महाराष्ट्र) , चिंताला वेंकट रेड्डी (कृषी - तेलंगण),  राधामोहन व साबरमती (संयुक्तपणे) (कृषी- ओडिशा), बटकृष्ण साहू (पशुसंवर्धन- ओडिशा) , त्रिनीती साईऊ (कृषी- मेघालय) यांच्यासह सामाजिक कार्य क्षेत्रासाठी महाराष्ट्रातील आदर्शग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचा समावेश आहे. 

दिवंगत माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, भाजपचे रणनितीकार अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आले. मुष्टियोद्धा मेरी कोम यांना ‘पद्मविभूषण’ने सन्मानित केले जाणार आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (मरणोत्तर), बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आदींचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्रातील १२ जणांचा समावेश आहे.

मार्च किंवा एप्रिलमध्ये पुरस्कारांचे वितरण होईल. यंदा सात जणांना पद्मविभूषण, सोळा जणांना पद्मभूषण आणि ११८ जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये ३४ महिलांचाही समावेश आहे. बारा जणांना मरणोत्तर हे पुरस्कार प्रदान केले जातील. 

पद्मविभूषण

 • जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर) (सामाजिक व्यवहार-बिहार) 
 • अरुण जेटली (मरणोत्तर) (सामाजिक व्यवहार-दिल्ली)  
 • सर अनिरुद्ध जगन्नाथ जीसीएसके (सामाजिक व्यवहार-मॉरिशस)  
 • मेरी कोम (क्रीडा-मणिपूर)  
 • छन्नुलाल मिश्रा (कला- उत्तर प्रदेश)  
 • सुषमा स्वराज (मरणोत्तर) (सामाजिक व्यवहार- दिल्ली)  
 • विश्‍वेशतीर्थ स्वामीजी (मरणोत्तर) (अध्यात्म- कर्नाटक)

पद्मभूषण

 •  एम. मुमताज अली (अध्यात्म- केरळ) 
 •  सय्यद मुआज्जीम अली (मरणोत्तर) (सामाजिक व्यवहार-बांग्लादेश) 
 •  मुझफ्फर हुसैन बेग (सामाजिक व्यवहार-जम्मू आणि काश्‍मीर) 
 •  अजय चक्रवर्ती (कला- पश्‍चिम बंगाल) 
 •  मनोज दास (साहित्य आणि शिक्षण - पुद्दुचेरी) 
 •  बालकृष्ण दोषी (वास्तुरचनाकार- गुजरात) 
 •  कृष्णाम्मल जगन्नाथन (सामाजिक सेवा- तमिळनाडू) 
 •  एस. सी. जमीर (सामाजिक व्यवहार- नागालॅंड) 
 •  अनिल प्रकाश जोशी (सामाजिक सेवा- उत्तराखंड) 
 •  त्सेरिंग लॅंडोल (वैद्यकीय- लडाख) 
 •  आनंद महिंद्रा (व्यापार आणि उद्योग- महाराष्ट्र) 
 •  नीळकंठ मेनन (मरणोत्तर) (सामाजिक व्यवहार- केरळ) 
 •  मनोहर पर्रीकर (मरणोत्तर) (सामाजिक व्यवहार- गोवा) 
 •  जगदीश सेठ (साहित्य आणि शिक्षण- अमेरिका) 
 •  पी. व्ही. सिंधू (क्रीडा-तेलंगण) 
 •  वेणू श्रीनिवासन (व्यापार आणि उद्योग- तमिळनाडू)

पद्मश्री

 •  गुरु शशधर आचार्य (कला- झारखंड) 
 •  डॉ. योगी एरोन (वैद्यकीय- उत्तराखंड) 
 •  जयप्रकाश अगरवाल (व्यापार - दिल्ली) 
 •  जगदीशलाल अहुजा (सामाजिक कार्य- पंजाब) 
 •  काझी मासूम अख्तर (साहित्य आणि शिक्षण- पश्‍चिम बंगाल) 
 •  ग्लोरिया एरिएरा (साहित्य आणि शिक्षण- ब्राझील) 
 •  झहीर खान (क्रीडा- महाराष्ट्र) 
 •  डॉ. पद्मवर्ती बंदोपाध्यात (वैद्यकीय- उत्तर प्रदेश) 
 •  डॉ. सुशोवन बॅनर्जी (वैद्यकीय- पश्‍चिम बंगाल) 
 •  डॉ. दिगंबर बेहरा (वैद्यकीय- चंदीगड) 
 •  डॉ. दमयंती बेश्रा (साहित्य व शिक्षण- ओडिशा) 
 •  पोपटराव पवार (सामाजिक कार्य- महाराष्ट्र) 
 •  अभिराज मिश्रा (साहित्य व शिक्षण- हिमाचल प्रदेश)
 •   बिनापनी मोहंती (साहित्य व शिक्षण- ओडिशा)
 •   डॉ. अरुणोदय मोंडल (वैद्यकीय- पश्‍चिम बंगाल)
 •   डॉ. पृथ्वींद्र मुखर्जी (साहित्य व शिक्षण- फ्रान्स) 
 •  सत्यनारायण मुंदयूर (सामाजिक कार्य- अरुणाचल प्रदेश) 
 •  मणिलाल नाग (कला- पश्‍चिम बंगाल) 
 •  एन. चंद्रशेखर नायर (साहित्य व शिक्षण- केरळ) 
 •  डॉ. तेस्तू नाकामुरा (सामाजिक कार्य- अफगाणिस्तान)- मरणोत्तर 
 •  शिवदत्त निर्मोही (साहित्य व शिक्षण- जम्मू व काश्‍मीर) 
 •  पु लालबियाकथंगा पाचुआउ (साहित्य व शिक्षण, पत्रकारिता- मिझोराम) 
 •  मूळीक्कल पंकजाक्षी (कला- केरळ) 
 •  प्रसंताकुमार पटनाईक (साहित्य व शिक्षण- अमेरिका) 
 •  जोगेंद्रनाथ फुकन (साहित्य व शिक्षण- आसाम) 
 •  राहिबाई सोमा पोपेरे (कृषी- महाराष्ट्र) 
 •   योगेश प्रवीण (साहित्य व शिक्षण- उत्तर प्रदेश) 
 •  जीतू राय (क्रीडा- उत्तर प्रदेश)
 •  तरुणदीप राय (क्रीडा- उत्तर प्रदेश)
 •   एस. रामकृष्णन (सामाजिक कार्य- तमिळनाडू) 
 •  रानी रामपाल (क्रीडा- हरियाना) 
 •  कंगणा राणावत (कला- महाराष्ट्र) 
 •  दलवाई चलपती राव (कला- आंध्र प्रदेश) 
 •  शाहबुद्दीन राठोड (साहित्य व शिक्षण- गुजरात) 
 •  कल्याणसिंह रावत (सामाजिक कार्य- उत्तराखंड) 
 •  चिंताला वेंकट रेड्डी (कृषी- तेलंगण) 
 •  डॉ. शांती रॉय (वैद्यकीय- बिहार) 
 •  राधामोहन व साबरमती (संयुक्तपणे) (कृषी- ओडिशा)
 •   बटकृष्ण साहू (पशुसंवर्धन- ओडिशा) 
 •  त्रिनीती साईऊ (कृषी- मेघालय) 
 •  हिंमतराम भांबू (सामाजिक कार्य- राजस्थान) 
 •  संजीव भिकचंदानी (व्यापार आणि उद्योग- उत्तर प्रदेश) 
 •  गफुरभाई एम. बिलाखिया (व्यापार व उद्योग- गुजरात) 
 •  बॉब ब्लॅकमन (सार्वजनिक व्यवहार- ब्रिटन) 
 •  इंदिरा पी.पी.बोरा (कला- आसाम) 
 •  मदनसिंह चौहान (कला-छत्तीसगड)
 •   उषा चौमार (सामाजिक कार्य- राजस्थान) 
 •  लिल बहादूर छेत्री (साहित्य आणि शिक्षण- आसाम) 
 •  ललिता आणि सरोजा चिदंबरम (संयुक्तपणे) (कला-तमिळनाडू) 
 •  वज्र चित्रसेना (कला- श्रीलंका) 
 •  पुरुषोत्तम दधिच (कला- मध्य प्रदेश) 
 •  उत्सव चरणदास (कला-ओडिशा) 
 •  इंद्र दासनायके (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण- श्रीलंका) 
 •  एच.एम.देसाई (साहित्य आणि शिक्षण- गुजरात) 
 •  मनोहर देवादोस (कला- तमिळनाडू)
 •   ओईनाम बेमबेम देवी (क्रीडा- मणिपूर) 
 •  लिया डिस्किन (सामाजिक कार्य- ब्राझील) 
 •  एम.पी.गणेश (क्रीडा-कर्नाटक) 
 •  डॉ. बंगलोर गंगाधर (वैद्यकीय-कर्नाटक) 
 •  डॉ. रमन गंगाखेडकर (विज्ञान आणि अभियांत्रिकी-महाराष्ट्र) 
 •  बॅरी गार्डिनर (सामाजिक व्यवहार- ब्रिटन) 
 •  चेवांग मोटूप गोबा (उद्योग आणि व्यापार- लडाख) 
 •  भारत गोयंका (व्यापार आणि उद्योग- कर्नाटक) 
 •  याडला गोपालराव (कला- आंध्र प्रदेश) 
 •  मित्रभानू गौनतिया(कला- ओडिशा) 
 •  तुलसी गौडा(सामाजिक कार्य-कर्नाटक) 
 •  सुजोय के. गुहा(विज्ञान आणि अभियांत्रिकी-बिहार) 
 •  हरेकाला हाजब्बा(सामाजिक कार्य-कर्नाटक) 
 •  इनामुल हक (पुरातत्वशास्त्र- बांगलादेश) 
 •  मधु मन्सुरी हसमुख (कला-झारखंड) 
 •  अब्दुल जब्बार (सामाजिक कार्य-मध्य प्रदेश) (मरणोत्तर) 
 •  विमल कुमार जैन (सामाजिक कार्य- बिहार) 
 •  मीनाक्षी जैन (साहित्य व शिक्षण- दिल्ली) 
 •  नेमनाथ जैन (व्यापार व उद्योग- मध्य प्रदेश) 
 •  शांती जैन (कला- बिहार) 
 •  सुधीर जैन (विज्ञान व अभियांत्रिकी- गुजरात) 
 •  बेनिचंद्र जमातिया (साहित्य व शिक्षण- त्रिपुरा) 
 •  के.व्ही. संपतकुमार आणि विदुशी जयलक्ष्मी के.एस  (संयुक्तपणे) (साहित्य आणि शिक्षण व पत्रकारीता- कर्नाटक) 
 •  करण जोहर (कला-महाराष्ट्र) 
 •  लीला जोशी (वैद्यकीय- मध्य प्रदेश)
 •   सरीता जोशी (कला- महाराष्ट्र)
 •   सी. कामलोव्हा (साहित्य व शिक्षण- मिझोराम) 
 •  डॉ. रवी कन्नन आर. (वैद्यकीय-आसाम) 
 •  एकता कपूर (कला-महाराष्ट्र) 
 •  याझदी नाओशिर्वान करंजिया (कला- गुजरात) 
 •  नारायण जे. जोशी करयाल (साहित्य व शिक्षण- गुजरात) 
 •  डॉ. नरिंदरनाथ खन्ना (वैद्यकीय- उत्तर प्रदेश) 
 •  नवीन खन्ना (विज्ञान व अभियांत्रिकी- दिल्ली) 
 •  एस.पी. कोठारी (साहित्य व शिक्षण-अमेरिका) 
 •  व्ही.के मुनुसामी कृष्णपख्तार (कला- पुद्दुचेरी) 
 •  एम.के. कुंजोळ (सामाजिक कार्य- केरळ) 
 •  मनमोहन महापात्रा (कला-ओडिशा)(मरणोत्तर) 
 •  उस्ताद अन्वर खान मंगनियार (कला- राजस्थान) 
 •  कट्टुंगल सुब्रह्मण्यम मणीलाल (विज्ञान व अभियांत्रिकी- केरळ) 
 •  मुन्ना मास्टर (कला-राजस्थान)
 •   अदनान सामी (संगीत - महाराष्ट्र) 
 •  विजय संकेश्वर (व्यापार - कर्नाटक) 
 •  डॉ. कुशल कन्वर शर्मा (वैद्यकीय - आसाम) 
 •  सईद मेहबूब शहा कादरी उर्फ सय्यदभाई (सामाजिक कार्य - महाराष्ट्र) 
 •  महंमद शरीफ (सामाजिक कार्य - उत्तर प्रदेश) 
 •  श्‍यामसुंदर शर्मा ( कला - बिहार) 
 •  डॉ. गुरदीप सिंह (वैद्यकीय- गुजरात)
 •   रामजी सिंह ( सामाजिक कार्य - बिहार) 
 •  वशिष्ठ नारायण सिंह ( विज्ञान आणि तंत्रज्ञान - बिहार) (मरणोत्तर) 
 •  दयाप्रकाश सिन्हा (कला - उत्तर प्रदेश) 
 •  डॉ. सॅंड्रा देसा सुझा (वैद्यकीय - महाराष्ट्र)  
 •  विजयसारथी श्रीभाष्यम (साहित्य - तेलंगण)  श्रीमती काली शाबी मेहबूब आणि शेख मेहबूब सुबानी (संयुक्तपणे)(कला - तमिळनाडू) 
 •  जावेद अहमद टाक (सामाजिक कार्य - जम्मू-काश्‍मीर) 
 •  प्रदीप थलाप्पील (विज्ञान आणि तंत्रज्ञान - तमिळनाडू)  
 •  येशी दोर्जी थोंगची (साहित्य - अरुणाचल प्रदेश) 
 •  रॉबर्ट थर्मन (साहित्य - अमेरिका) 
 •  अगुस इंद्र उदयाना (सामाजिक कार्य - इंडोनेशिया) 
 •  हरिशचंद्र वर्मा (विज्ञान आणि तंत्रज्ञान - उत्तर प्रदेश) 
 •  सुंदरम वर्मा (सामाजिक कार्य - राजस्थान) 
 •  डॉ. रोमेश टेकचंद वाधवानी ( व्यापार व उद्योग - अमेरिका) 
 •   सुरेश वाडकर (कला - महाराष्ट्र) 
 •  प्रेम वस्ता (व्यापार - कॅनडा)

इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...