agriculture news in marathi Central extends Licenses period till 30 September for Seed Companies | Agrowon

बियाणे कंपन्यांच्या परवान्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

देशभरात बियाणे उत्पादन कंपन्यांच्या परवान्याच्या नूतनीकरणाला केंद्रीय कृषी मंत्रालयाने आता थेट ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पुणे : देशभरात बियाणे उत्पादन कंपन्यांच्या परवान्याच्या नूतनीकरणाला केंद्रीय कृषी मंत्रालयाने आता थेट ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. लॉकडाऊनमुळे नूतनीकरण रखडल्याने हैराण झालेल्या कंपन्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी बियाणे कंपन्यांच्या परवान्यांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या सूचना गुणनियंत्रण विभागाला दिलेल्या आहेत. बियाणे उद्योगाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज्यात अंदाजे ८५० पेक्षा जास्त कंपन्यांकडून बियाणे उत्पादन, पॅकिंग,साठवण,वाहतूक किंवा विक्रीशी संबंधित कामे केली जातात. यातील नूतनीकरण रखडलेल्या दीडशे कंपन्यांना या निर्णयाचा लगेच फायदा मिळणार आहे.

लॉकडाऊनमुळे बियाणे कंपन्यांना परवाना नूतनीकरणाबाबत अत्यावश्यक प्रक्रिया पार पाडता आलेल्या नाहीत. त्यामुळे ऐन खरिपात कंपन्यांचे कामकाज बेकायदेशीर ठरण्याचा धोका तयार झाला होता. ही बाब राष्ट्रीय पातळीवरील बियाणे संघटनांनी केंद्र शासनाच्या निदर्शनास आणली होती.

सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र देखील या मुद्याबाबत पाठपुरावा करीत होते. आयुक्तांनी ही समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी केंद्रीय कृषी आयुक्त दिलीप श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे नूतनीकरणाला मुदतवाढ देण्याचा मार्ग मोकळा झाला.

बियाणे कंपन्यांना कृषी आयुक्तालयाकडून दर तीन वर्षांनी परवान्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागते. काही महिन्यांपूर्वीच या नियमात बदल करून हा कालावधी पाच वर्षांचा करण्यात आला होता. मात्र, आधीच्या मुदतीनुसार नूतनीकरणाच्या प्रक्रियेत अनेक कंपन्या अडकल्या होत्या.

प्रतिक्रिया...
“शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात अडचणी येऊ नयेत यासाठी कृषी विभागाने प्रत्येक टप्प्यावर चांगले काम केले आहे. कृषी यंत्रणेच्या सोबत बियाणे कंपन्या सतत काम करीत आहेत. बियाणे परवान्यांच्या नूतनीकरणाच्या मुद्द्याकडे राष्ट्रीय व राज्य बियाणे संघटनेकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र, कृषी आयुक्तांनी या समस्येची तातडीने दखल घेतली. या निर्णयामुळे बियाणे उद्योगाला दिलासा मिळाला आहे.”
- अजित मुळे, अध्यक्ष,
सीड इंडस्ट्रिज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...