agriculture news in marathi Central government failed to solve the farmers issue : Leaders reacts on 25th day | Agrowon

प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात केंद्र सरकार अपयशी : शेतकरी नेत्यांचा आरोप

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 डिसेंबर 2020

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाने दिलेल्या मुदतीत आणि सात बैठका होऊनही प्रश्‍नांची सोडवणूक करण्यास केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. सरकारकडून कोणतेही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात नसल्याचे या नेत्यांनी सांगितले. 
 

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाने दिलेल्या मुदतीत आणि सात बैठका होऊनही प्रश्‍नांची सोडवणूक करण्यास केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. सरकारकडून कोणतेही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात नसल्याचे या नेत्यांनी सांगितले. 

गेल्या २५ दिवसांपासून सुमारे ४० शेतकरी संघटनांकडून येथे आंदोलन सुरू आहे, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर सरकारकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष मनजितसिंग राय म्हणाले, की केंद्र सरकार विनाकारण आमच्या प्रकरणात उशीर करत आहे. आतापर्यंत कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना घरी जाऊ दिले पाहिजे होते. नवे वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रश्‍नांची सोडवणूक केली जाईल, असे सरकार म्हणत असले, तरी आम्हाला कोणतीही आशा दिसत नाही. 
दरम्यान, आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना रविवारी देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली. 

तोमर आज आंदोलकांना भेटणार : शहा
शेतकरी आंदोलन संपविण्याबाबत चर्चाकरण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर सोमवारी किंवा मंगळवारी तेथील संघटनांच्या प्रतिनिधींना भेटतील, अशी माहिती पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. 

किसानदिनी अन्न शिजवू नका
२३ डिसेंबरला किसान दिन आहे. या दिवशी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कोणीही अन्न शिजवू नये अशी विनंती शेतकरी करणार असल्याची माहिती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली. तर स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी सोमवार (आज) शेतकरी उपोषण करतील असे सांगितले. 

२५ ते २७ टोल बंद
शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून हरियानातील महामार्गावर २५ ते २७ डिसेंबर दरम्यान टोलनाके शेतकरी बंद पाडतील, अशी माहिती शेतकरी नेते जगजितसिंग दालेवाला यांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...