कांदा निर्यातीचे परिपत्रक अखेर निघाले; मोठा दिलासा

कांदा निर्यातीचे परिपत्रक अखेर निघाले; मोठा दिलासा
कांदा निर्यातीचे परिपत्रक अखेर निघाले; मोठा दिलासा

पुणे : केंद्र सरकारने लागू केलेली कांदा निर्यातबंदी विनाअटीशर्ती अखेर उठविली आहे. १५ मार्चपासून कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटर द्वारे दिली होती, यानंतर वाणिज्य मंत्रालयाकडून यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आल्याने यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.   कोसळणारे दर आणि निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत आज शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून जोरदार आंदोलन केले होते. यानंतर हरकतीत आलेल्या वाणिज्य मंत्रालयाने अखेर पतपत्र आणि किमान निर्यात मुल्याची कोणतीही अट न टाकता निर्यातबंदी उठविण्यात आल्याचे परिपत्रक उशिरा काढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.   

तत्पुर्वी केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यात आल्याची माहिती २६ फेब्रुवारीस दिली होते. मात्र, यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आले नव्हते. चार दिवस झाले, तरी परिपत्रक निघत नसल्यामुळे कांदा निर्यातदार, व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांत प्रचंड रोष होता. आज (ता.२) लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू झाले तेव्हा कमी दर निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. याचे पडसाद जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांत उमटले. परिणामी जवळपास जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत लिलाव काही काळ बंद होते. तसेच जोपर्यंत निर्यातबंदी हटविण्यात येणार नाही, तोपर्यंत लिलाव न करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला होता.

अखेर मंत्री पीयूष गोयल यांनी आज ट्वीटर द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला, यानंतर आलेल्या परिपत्रकानंतर याबाबतची स्पष्टता आलीआहे. ८५० डॉलर एमईपीही रद्द करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com