agriculture news in marathi Central Government must not Dishonor agitating Farmer | Agrowon

शेतकऱ्यांना अपमानित करून दिल्लीतून पाठवू नये : राज्यपाल मलिक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 मार्च 2021

सरकारने शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परत पाठवू नये. त्यांना अपमानित करू नये, असे झाले, तर ते पुढील ३०० वर्षेही विसरणार नाहीत, हे लक्षात घ्यावे, अशा शब्दांत मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कान पिळले आहेत. 

बागपत, उत्तर प्रदेश : सरकारने शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परत पाठवू नये. त्यांना अपमानित करू नये, असे झाले, तर ते पुढील ३०० वर्षेही विसरणार नाहीत, हे लक्षात घ्यावे, अशा शब्दांत मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कान पिळले आहेत. 

केंद्राचे तीन कृषी कायदे आणि हमीभावाच्या कायद्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. २२ जानेवारीपासून सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याचे पाहून व्यथित झालेल्या राज्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारला अनुभवाचा सल्ला दिला आहे. बागपत येथे कार्यक्रमात आणि नंतर पत्रकारांशी बोलताना राज्यपाल मलिक यांनी आपले मत व्यक्त केले. 

ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा जो सत्यनाश आहे, तो त्यांना माहीत न होता होत आहे. दुसरीकडे कोठेही शेतीमाल विकू शकतात, असा खूप प्रचार केला गेला. हे तर १५ वर्षांपूर्वीचे कायदे आहेत, असेही म्हटले गेले. मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने आज कोणतेही कायदे लागू नाहीत, बाकी बोलण्याच्या गोष्टी आहेत.’’ 

राज्यपाल मलिक म्हणाले, ‘‘आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर दबाव टाकून, अपमानित करून दिल्लीतून पाठविणे योग्य नाही. तसेही ते रिकाम्या हाती परत जाण्यासाठी आलेले नाहीत आणि जाणारही नाहीत आणि ते गेलेच तर तीनशे वर्षे ते विसरणार नाहीत.’’ 

राकेश टिकैत यांना अटक होणार होती...
२८ जानेवारीला राकेश टिकैत यांच्या अटकेच्या प्रसंगावरून बोलताना राज्यपाल मलिक म्हणाले, की सरकारमधल्या एका मोठ्या माणसाशी बोललो. त्यांना म्हणालो, की ते रडलेत, आज त्यांची अटक करू नका. त्यांच्या घरी हजारो लोक एकत्रित आलेत. मुजफ्फरनगरमध्ये लाखोंच्या रॅलीची तयारी सुरू आहे, हिंसा होण्याची शक्यता आहे. आज त्यांना अटक करू नका, नंतर करा, असा सल्ला मी दिला.

हमीभावावर कायदा करा...
हमीभावावर कायदा करा, मी स्वत: आंदोलन समाप्तीसाठी प्रयत्न करेन. हमीभावाची मागणी मान्य केली, तर कृषी कायद्यांतील संशोधनासही शेतकरी राजी होतील, सरकारपण याकरिता तयार आहे आणि प्रश्‍नही मार्गी लागेल.
- राज्यपाल सत्यपाल मलिक

राज्यपाल म्हणाले...

  •     आधी मी शेतकरी आहे, नंतर राज्यपाल
  •     सरकार आणि शेतकरी जवळ यावेत यासाठी प्रयत्न
  •     मी शेतकऱ्यांसमवेत, शेतकऱ्यांच्या मागण्याही योग्य

इतर अॅग्रो विशेष
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...
...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस...कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी...
पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर...नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य...
रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच...पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत...
खानदेशात केळी दर स्थिरजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक...
घोटभर पाणी बेतले मायलेकीच्या जिवावरउंडवडी, जि. पुणे :  पिण्यासाठी पाणी काढताना...
हरभरा पीक करणार यंदाही रब्बीचे नेतृत्व पुणे ः राज्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
‘मामा’ तलाव रुतले गाळात साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्यपुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता....
कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदीपुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात...
ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘...पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी...
मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून...नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (...
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारीपुणे ः आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः...
पालघर, नाशिकमध्ये मुसळधारपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा...